Join us

Sorghum Market : पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे ज्वारीचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 8:11 PM

आज राहूरी -वांबोरी, कोपरगाव, पुणे, पैठण आदी बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली.

आज राज्यातील बहुतांश समित्या बंद असल्याने ज्वारीची 760 क्विंटलची आवक झाली. यात राहूरी -वांबोरी, कोपरगाव, पुणे, पैठण आदी बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1915 रुपयापासून ते 4250 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. 

आज 11 एप्रिल 2024 पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण, लोकल, मालदांडी आणि रब्बी ज्वारी बाजारात आली. यात राहूरी -वांबोरी बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीची 11 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1852 तर सरासरी 1915 रुपये दर मिळाला. कोपरगाव बाजार समितीत लोकल ज्वारीची 38 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला सरासरी 2510 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीची 691 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये तर सरासरी 4250 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीची 20 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला कमीत कमी 2476 रुपये तर सरासरी 2550 रुपये दर मिळाला. 

असे आहेत ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/04/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल11185219761915
कोपरगावलोकलक्विंटल38219025992510
पुणेमालदांडीक्विंटल691350050004250
पैठणरब्बीक्विंटल20247630912550
टॅग्स :शेतीज्वारीमार्केट यार्डपुणे