Join us

Sorghum Market : शाळू आणि मालदांडी ज्वारीची आवक अन् भावही घटला, जाणून घ्या आजचे सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 4:24 PM

आजच्या बाजार दर अहवालानुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

गेल्या काही दिवसांपासून ज्वारीची आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी चौदा हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. आज आठवड्याचा पहिला दिवस असून अद्यापपर्यंत केवळ साडेचार हजार क्विंटल ज्वारीची आवक झाल्याचे पणन मंडळाच्या अधिकृत संकतेस्थळावर पाहायला मिळत आहे. आजच्या अधिकृत माहितीनुसार सरासरी 2 हजार पासून ते 5 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यात मालदांडी वाणाला सर्वाधिक दर मिळत असल्याचे चित्र आहे. 

आज 11 मार्च 2024 च्या बाजार दर अहवालानुसार राज्यातील बाजार समित्यां मिळून जवळपास 4 हजार 667 इतकी आवक झाली. बाजार समित्यामध्ये दादर, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, शाळू अशा ज्वारीची आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 1800 क्विंटलची आवक चाळीसगाव बाजार समितीत पांढऱ्या  ज्वारीची झाली. त्याखालोखाल जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 5 हजार 50 रुपयांचा बाजारभाव पुणे बाजार समितीत मालदांडी या वाणाला मिळाला. मात्र आज तब्बल दोनशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. त्या खालोखाल मंगळवेढा बाजार समितीत 3 हजार 800 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. तर सर्वात कमी 1700 रुपयांचा बाजारभाव परतूर बाजारसमितीत शाळू ज्वारीला मिळाला.

या जिल्ह्यात सर्वाधिक आवक 

पणन मंडळाच्या माहितीनुसार आज जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची आवक झाली. यात पांढरी ज्वारीची 1800 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला सरासरी 2200 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीची 132 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला 2251 रुपये भाव मिळाला. दादर या ज्वारीची 773 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला सरासरी 2738 रुपये भाव मिळाला. अमरावती बाजार समितीत लोकल ज्वारीची केवळ तीन क्विंटल आवक झाली. आज देखील मालदांडी ज्वारीसह शाळू ज्वारीला चांगला आणि सर्वाधिक भाव मिळाला. मात्र मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज बाजारभाव घसरल्याचे दिसून आले. 

असे आहेत ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/03/2024
जळगावदादरक्विंटल747251033503000
जलगाव - मसावतदादरक्विंटल26247524752475
धुळेहायब्रीडक्विंटल84189023262270
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल132211123252251
अमरावतीलोकलक्विंटल3250027502625
पुणेमालदांडीक्विंटल670480053005050
नांदगावमालदांडीक्विंटल30180027152050
मंगळवेढामालदांडीक्विंटल289280039803800
परांडामालदांडीक्विंटल18285033803100
मालेगावपांढरीक्विंटल21207022752275
चाळीसगावपांढरीक्विंटल1800205023852200
औराद शहाजानीपांढरीक्विंटल5250032002850
मुरुमपांढरीक्विंटल74250043003400
तुळजापूरपांढरीक्विंटल90250040003500
पाथरीपांढरीक्विंटल33202523502200
दुधणीपांढरीक्विंटल227204034503000
परतूरशाळूक्विंटल20150019001700
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीनागपूरशेती क्षेत्र