Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Import : गव्हाच्या आयातीबाबत शुल्करचनेत बदल नाही, अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण 

Wheat Import : गव्हाच्या आयातीबाबत शुल्करचनेत बदल नाही, अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण 

Latest News 112 million MT wheat production in 2024 rabbi season see details | Wheat Import : गव्हाच्या आयातीबाबत शुल्करचनेत बदल नाही, अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण 

Wheat Import : गव्हाच्या आयातीबाबत शुल्करचनेत बदल नाही, अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण 

Wheat Production : यंदाच्या 2024 च्या रब्बी विपणन हंगामात 112 दशलक्ष मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन (Wheat Crop) झाले आहे.

Wheat Production : यंदाच्या 2024 च्या रब्बी विपणन हंगामात 112 दशलक्ष मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन (Wheat Crop) झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Wheat Production : यंदाच्या 2024 च्या रब्बी विपणन हंगामात 112 दशलक्ष मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन (Wheat Crop) झाले आहे.  तसेच यंदा गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे गव्हाच्या आयातीबाबत (Wheat Import) शुल्करचनेत बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. शिवाय गव्हाच्या बाजारपेठेतील दरावर केंद्राचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. 

यंदा 2024 च्या रब्बी विपणन हंगामात, विभागाने 112 दशलक्ष मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन झाल्याची नोंद केली. भारतीय अन्न महामंडळाने या हंगामात 11 जून पर्यंत सुमारे 266 लाख मेट्रीक टन गहू खरेदी केला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्य कल्याणकारी योजनांसाठी लागणारा सुमारे 184 लाख मेट्रीक टन गहू पुरवल्यानंतर बाजारात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असेल जेणेकरून परिस्थिती उद्भवल्यास दराबाबत हस्तक्षेप करणे शक्य होईल. सध्या गव्हाच्या दरावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नफेखोरांकडून साठेबाजी होऊ नये व गव्हाच्या किंमती स्थिर राहाव्यात यासाठी आवश्यकता भासल्यास विभागाकडून हस्तक्षेप करण्यात येईल.

दरम्यान सरकारकडून केला जाणारा बफर अर्थात जास्तीचा साठा करण्याबाबत नियम वर्षातील प्रत्येक तिमाहीसाठी वेगवेगळे राहतात. 1 जानेवारी 2024 रोजी नियमानुसार जास्तीच्या साठ्याची  विहित मर्यादा 138 लाख मेट्रीक टन असताना प्रत्यक्षात 163.53 लाख मेट्रीक टन गव्हाचा साठा उपलब्ध होता. गव्हाचा साठा आजवर एकदाही तिमाहीसाठी असलेल्या मर्यादेच्या खाली गेलेला नाही. तसेच, सद्यस्थितीत गव्हाच्या आयातीसंदर्भातील शुल्करचनेत बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 

आज गव्हाला काय बाजारभाव 

यंदा गहू बाजारात येऊन मोठा कालावधी लोटला असून अद्यापही अनेक भागातून गव्हाची आवक बाजारात होत आहे. आज गव्हाला सरासरी २ हजार रुपयापासून ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. यात कळवण बाजारात सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2401 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात २१८९ गव्हाला सरासरी 2551 रुपये, मुरुम    बाजारात बन्सी गव्हाला सरासरी 4311 रुपये दर मिळाला. लोकल गव्हाला सरासरी 2000 रुपयापासून ते 2900 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

Web Title: Latest News 112 million MT wheat production in 2024 rabbi season see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.