Join us

कांद्याला कुठे आणि कसा बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 4:51 PM

आज राज्यातील कोणत्या बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊया...

कांदा प्रश्नावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातबंदी रद्द करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र कांदा बाजारभावाची परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 1150 रुपये बाजारभाव मिळाला. 

आज 12 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव  बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 10 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर कोल्हापूर बाजार समिती जवळपास 6 हजार 20 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 400 रुपये मिळाला तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. पुणे बाजार समितीत 10 हजार 112 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1050 रुपये दर मिळाला.

कराड बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 99 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1300 दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 2840 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 250 रुपये तर सरासरी केवळ 750 रुपये दर मिळाला. सातारा बाजार समितीमध्ये 323 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी  1000 रुपये तर सरासरी  1300 रुपये बाजारभाव मिळाला.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिककांदामार्केट यार्ड