Join us

Onion Market : सोलापूर, नाशिकमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक, लाल-उन्हाळ कांद्याचे आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 6:09 PM

आजच्या बाजार अहवालानुसार लाल आणि उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. आज देखील सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होत असल्याचे चित्र आहे. आतापर्यत राज्यातील बाजार समित्यांमध्ये पावणेदोन क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तर आजच्या अहवालानुसार सरासरी 1400 ते 1500 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. 

आज 12 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली. यात कोल्हापूर, सोलापूर, मुंबई - कांदा बटाटा मार्केट, मालेगाव-मुंगसे, उमराणे, पुणे आदी बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 34 हजार 502 क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीत झाली. दुसरीकडे एक नंबर कांद्यासह हलवा कांद्याची आवक कमी झाल्याचे दिसून आले. तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 55 हजार 203 क्विंटल कांद्याची आवक सहा वाजेपर्यंत झाली होती. 

राज्यातील निवडक बाजार समित्या बाजारभाव 

आज नागपूर बाजार समितीत सर्वाधिक सरासरी 1875 रुपयांचा बाजारभाव लाल कांद्याला मिळाला आहे. दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत सर्वाधिक बाजारभाव मिळत होता. मात्र नागपूर बाजार समितीत चांगला बाजारभाव मिळाला आहे. त्या खालोखाल कराड बाजार समितीत हालवा कांद्याला सरासरी 1800 रुपयांचा भाव मिळाला आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1780 रुपये बाजारभाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला  1651 रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचा बाजारभाव 

आज कळवण, संगमनेर, पिंपळगाव बसवंत, रामटेक, देवळा, अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज जवळपास 16 हजार क्विंटलहुन अधिक आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 1700 रुपयांचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मिळाला. तर सर्वात कमी 1100 रुपयांचा दर संगमनेर बाजार समितीत मिळाला. तर लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 1651 रुपये दर मिळाला. 

आजचे कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/03/2024
कोल्हापूर---क्विंटल482560019001200
अकोला---क्विंटल441120020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल293260018001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल14106120018001500
खेड-चाकण---क्विंटल150130018001500
दौंड-केडगाव---क्विंटल597250020001600
राहता---क्विंटल207960020001550
कराडहालवाक्विंटल99150018001800
सोलापूरलालक्विंटल3450210022001200
येवला -आंदरसूललालक्विंटल300050016711550
जळगावलालक्विंटल243557517501200
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200090017271600
नागपूरलालक्विंटल2680150020001875
सिन्नरलालक्विंटल314950016101500
सिन्नर - नायगावलालक्विंटल20450017461650
कळवणलालक्विंटल280070018001300
संगमनेरलालक्विंटल101720020001100
चांदवडलालक्विंटल500088019761700
मनमाडलालक्विंटल400040017181500
सटाणालालक्विंटल855030017001575
पाथर्डीलालक्विंटल2630014001200
भुसावळलालक्विंटल46120016001500
देवळालालक्विंटल400030017001550
उमराणेलालक्विंटल1250070117901680
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल54960020001300
पुणेलोकलक्विंटल1954160018001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल51360014001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3500120017131550
वडगाव पेठलोकलक्विंटल75100020001200
वाईलोकलक्विंटल1580016001300
कामठीलोकलक्विंटल11150025002000
कल्याणनं. १क्विंटल3160019001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल900040020111750
कळवणउन्हाळीक्विंटल420090016751400
संगमनेरउन्हाळीक्विंटल916120020001100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2000140019491700
रामटेकउन्हाळीक्विंटल17140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल97590017001550
टॅग्स :शेतीकांदाबाजारमार्केट यार्डनाशिक