Join us

वसंत ज्वारी आली, मालदांडीचा भाव घसरला, जाणून घ्या आजचे ज्वारीचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 6:53 PM

ज्वारीमध्ये मालदांडी वाणाला सर्वाधिक भाव मिळत असला तरी मागील दिवसांच्या तुलनेत दर घसरत असल्याचे चित्र आहे. 

आज पुन्हा ज्वारीच्या आवकेत घट झाली असून राज्यातील बाजार समित्यामिळून 15 हजार क्विंटलची आवक झाली. आज जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 3600 क्विंटलची आवक पांढऱ्या ज्वारीची झाली आहे. आजच्या अधिकृत माहितीनुसार सरासरी 3 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यात मालदांडी वाणाला सर्वाधिक भाव मिळत असला तरी मागील दिवसांच्या तुलनेत दर घसरत असल्याचे चित्र आहे. 

आज 12 मार्च 2024 च्या बाजार दर अहवालानुसार राज्यातील बाजार समित्यां मिळून जवळपास 15 हजार 178 इतकी आवक झाली. बाजार समित्यामध्ये दादर, लोकल, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, शाळू तसेच आज कल्याण बाजार समितीत वसंत ज्वारीची आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 5000 रुपयांचा दर पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीला मिळाला. त्याखालोखाल मुंबई बाजार समितीत 4500 रुपयांचा दर लोकल ज्वारीला मिळाला. तर सर्वत कमी दर 1700 रुपयांचा दर उमरगा बाजार समितीत पांढरी ज्वारीला मिळाला. 

कुठे काय भाव मिळाला? 

दरम्यान आज गेवराई आणि पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीची आवक झाली. या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे सरासरी 2400 रुपये, 2020 रुपये असा दर मिळाला. कल्याण  बाजार समितीत वसंत ज्वारीची केवळ 3 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी सरासरी 3550 रुपये दर मिळाला. तसेच आज जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीला 3000 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत हायब्रीड वाणाला 3550 रुपये दर मिळाला. मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सर्वाधिक 4500 रुपये दर मिळाला. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये या वाणाला 2500 रुपयापर्यंत दर मिळाला. आज मालदांडी वाणाला सरासरी 3 हजारपर्यंत दर मिळाला. मुरुम बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला 3650 रुपये दर मिळाला. 

आजचे ज्वारीचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/03/2024
बार्शी---क्विंटल2273250046004000
बार्शी -वैराग---क्विंटल310250040263500
राहूरी -वांबोरी---क्विंटल27197630002222
करमाळा---क्विंटल315260047003400
राहता---क्विंटल2245124512451
जळगावदादरक्विंटल919240033003000
जलगाव - मसावतदादरक्विंटल58250028002600
अकोलाहायब्रीडक्विंटल7220022002200
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल225215023002225
नागपूरहायब्रीडक्विंटल3340036003550
मलकापूरहायब्रीडक्विंटल225190026252311
रावेरहायब्रीडक्विंटल2180018001800
अमरावतीलोकलक्विंटल3250028002650
मुंबईलोकलक्विंटल1858260060004500
हिंगोलीलोकलक्विंटल25225030002625
कोपरगावलोकलक्विंटल3189925602000
सोलापूरमालदांडीक्विंटल3356835683568
पुणेमालदांडीक्विंटल673480052005000
जिंतूरमालदांडीक्विंटल26210024002200
जामखेडमालदांडीक्विंटल1135250043003400
नांदगावमालदांडीक्विंटल15202227002650
मालेगावपांढरीक्विंटल14190049542257
चाळीसगावपांढरीक्विंटल1100210123002270
औराद शहाजानीपांढरीक्विंटल7220032002700
मुरुमपांढरीक्विंटल162295043503650
उमरगापांढरीक्विंटल3170028011700
पाथरीपांढरीक्विंटल8150021532001
आष्टी-जालनापांढरीक्विंटल1231023102310
पैठणरब्बीक्विंटल21195230002020
गेवराईरब्बीक्विंटल23160028962400
जालनाशाळूक्विंटल2589190033012700
चिखलीशाळूक्विंटल15205028002425
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल308200041013050
परतूरशाळूक्विंटल26200032202100
देउळगाव राजाशाळूक्विंटल14200025002300
तासगावशाळूक्विंटल18325034003330
गंगापूरशाळूक्विंटल9167025502211
कल्याणवसंतक्विंटल3350036003550
टॅग्स :शेतीबाजारमार्केट यार्डज्वारीनागपूर