उन्हाळ कांदा लागवड जोमात असताना दुसरीकडे लाल कांदा मात्र कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना रोजच कांदा बाजारभावात घसरण सुरु असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे कांद्याला मोठा खर्च होत असताना दुसरीकडे अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
आजच्या बाजारभाव अहवालानुसार लासलगाव बाजारसमितीत कांद्याला 1230 रुपये सरासरी भाव मिळाला. आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 8 हजार 942 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1230 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती जवळपास 6 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 300 रुपये मिळाला तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत 2 हजार 995 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1250 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 14 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1150 दर मिळाला.
पुणे बाजार समितीत 11 हजार 75 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1050 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीमध्ये आज पांढऱ्या कांद्याची 860 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1450 दर मिळाला. सोलापूर बाजार समितीमध्ये 40 हजार 722 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 100 रुपये तर सरासरी केवळ 1100 रुपये दर मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केट बाजार समितीमध्ये 9 हजार 292 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1300 रुपये बाजारभाव मिळाला.