Lokmat Agro >बाजारहाट > कांदा दर पुन्हा जैसे थे, आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? 

कांदा दर पुन्हा जैसे थे, आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? 

latest news 17 march todays onion market price in maharashtra bajar samitit | कांदा दर पुन्हा जैसे थे, आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? 

कांदा दर पुन्हा जैसे थे, आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? 

आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक झाली, तर बाजारभावही घसरले आहेत.

आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक झाली, तर बाजारभावही घसरले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा बाजारभावाची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून आजच्या घडीला प्रति क्विंटलला सरासरी हजार ते बाराशे रुपये बाजारभाव मिळत आहे. आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला आहे. 

आज 17 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या काही दिवसात कांदा बाजारभाव कमालीचा घटला आहे. आठ दिवसांपूर्वी बाजारभाव 1700 पर्यंत पोहचले होते. मात्र मागील तीन दिवसांपासून बाजारभाव थेट खाली आले आहेत. आज रविवार असल्याने निवडक बाजारसमित्यामध्ये कांदा आवक झाली. यात लाल, उन्हाळ कांद्यासह लोकल आणि चिंचवड कांद्याची आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 24 हजार 544 क्विंटल कांद्याची आवक पुणे बाजार समितीत झाली. तर पारनेर बाजार समितीत सर्वाधिक 14 हजार 437 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर सर्वात कमी आवक पुणे- खडकी    , मंगळवेढा, पुणे -पिंपरी बाजारसमितीत झाली. 

राज्यातील निवडक बाजार समित्या बाजारभाव 

आज पुणे बाजार समितीत लाल कांद्याचा बाजारभाव घसरला असून केवळ क्विंटलला 1000 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक सरासरी 1350 रुपयांचा भाव दौंड-केडगाव बाजार समितीत मिळाला. त्यामुळे कांदा बाजारभाव किती घसरले आहेत, हे दिसून येत आहे. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1125 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. पुणे -मोशी बाजार समितीत रुपयांचा सर्वात कमी 800 दर लाल कांद्याला मिळाला. 

असे आहेत कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/03/2024
दौंड-केडगाव---क्विंटल627540017001350
राहता---क्विंटल307420016501200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1199575018001300
भुसावळलालक्विंटल66100015001200
पुणेलोकलक्विंटल2454440016001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल1170013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल5306001000800
मंगळवेढालोकलक्विंटल730014001100
पारनेरउन्हाळीक्विंटल1443730016001125

Web Title: latest news 17 march todays onion market price in maharashtra bajar samitit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.