कांदा बाजारभावाची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून आजच्या घडीला प्रति क्विंटलला सरासरी हजार ते बाराशे रुपये बाजारभाव मिळत आहे. आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला आहे.
आज 17 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या काही दिवसात कांदा बाजारभाव कमालीचा घटला आहे. आठ दिवसांपूर्वी बाजारभाव 1700 पर्यंत पोहचले होते. मात्र मागील तीन दिवसांपासून बाजारभाव थेट खाली आले आहेत. आज रविवार असल्याने निवडक बाजारसमित्यामध्ये कांदा आवक झाली. यात लाल, उन्हाळ कांद्यासह लोकल आणि चिंचवड कांद्याची आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 24 हजार 544 क्विंटल कांद्याची आवक पुणे बाजार समितीत झाली. तर पारनेर बाजार समितीत सर्वाधिक 14 हजार 437 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर सर्वात कमी आवक पुणे- खडकी , मंगळवेढा, पुणे -पिंपरी बाजारसमितीत झाली.
राज्यातील निवडक बाजार समित्या बाजारभाव
आज पुणे बाजार समितीत लाल कांद्याचा बाजारभाव घसरला असून केवळ क्विंटलला 1000 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक सरासरी 1350 रुपयांचा भाव दौंड-केडगाव बाजार समितीत मिळाला. त्यामुळे कांदा बाजारभाव किती घसरले आहेत, हे दिसून येत आहे. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1125 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. पुणे -मोशी बाजार समितीत रुपयांचा सर्वात कमी 800 दर लाल कांद्याला मिळाला.
असे आहेत कांदा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
17/03/2024 | ||||||
दौंड-केडगाव | --- | क्विंटल | 6275 | 400 | 1700 | 1350 |
राहता | --- | क्विंटल | 3074 | 200 | 1650 | 1200 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 11995 | 750 | 1800 | 1300 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 66 | 1000 | 1500 | 1200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 24544 | 400 | 1600 | 1000 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 11 | 700 | 1300 | 1000 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 9 | 1000 | 1600 | 1300 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 530 | 600 | 1000 | 800 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 7 | 300 | 1400 | 1100 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 14437 | 300 | 1600 | 1125 |