Join us

Onion Market : आज कांद्याची 48 हजार क्विंटलची आवक, कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 6:56 PM

एकट्या भुसावळ बाजार समितीत दाखल झालेल्या लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला. 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक 10 हजार क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1200 रुपयापासून ते 1750 रुपयांपर्यत दर मिळाला. एकट्या भुसावळ बाजार समितीत दाखल झालेल्या लाल कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. 

आज 19 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला दौंड-केडगाव बाजारात 1700 रुपये, सातारा बाजार समितीत 1750 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. जुन्नर -आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी 1600 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 18 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. 

आज लोकल कांद्याला पुणे -पिंपरी बाजारात 1500 रुपये,  मंगळवेढा बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला. तसेच पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 10519 क्विंटलची आवक झाली. तर या बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1375 रुपये दर मिळाला. तर रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1500 रुपयांचा दर मिळाला. 

पाहुयात आजचे कांद्याचे दर 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/05/2024
अहमदनगर---क्विंटल289330022001500
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1051930022001375
जळगावलालक्विंटल41140016001500
नागपूरउन्हाळीक्विंटल42140016001500
पुणे---क्विंटल398570025001700
पुणेलोकलक्विंटल1905482516751250
पुणेचिंचवडक्विंटल10950100023101600
सातारा---क्विंटल521150020001750
सोलापूरलोकलक्विंटल4111013001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)48009
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र