Soyabean Bajarbhav : गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soyabean Bajarbhav) सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. मागील आठवडेभराचा बाजारभाव अहवाल पाहिला तर अकोला बाजारात सोयाबीनचे सरासरी किंमत 4254 प्रतिक्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीत दोन टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजेच सध्या सोयाबीनच्या किमती या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे चित्र आहे.
मागील दोन महिन्यांचा जर बाजार भाव पाहिला असता मे महिन्यात सोयाबीनला (Soyabean Market) सरासरी 4300 रुपये ते 4400 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर जून महिन्यात 04 हजार 200 रुपयापासून 04 हजार 300 रुपये पर्यंत सरासरी दर मिळाल्याचे चित्र आहे. तर जुलै महिन्यात साधारण 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे.
महाराष्ट्र, देशातील आवक
सोयाबीनची साप्ताहिक आवक पाहिली असता महाराष्ट्रात मे महिन्यात 10 ते 20 टनांच्या आसपास तर देशभरात 70 ते 90 टनांपर्यंत आवक होती. तर जून महिन्यात साधारण 20 ते 25 टन इतकी आवक महाराष्ट्रात होती. तर देशभरात ही आवक 90 ते 120 टन इतकी झाली होती. तर जुलै महिन्यात जवळपास 20 टन आवक ही महाराष्ट्रात असून तर देशभरात 80 टनापासून ते 110 टनापर्यंत आवक आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनचे आवक मध्ये राष्ट्रीय पातळीवर 21 टक्क्यांची घट झाली आहे.
महाराष्ट्र, देशातील बाजारभाव
मागील सप्ताह हातील सोयाबीनच्या निवडक बाजारातील सरासरी किमती पाहिले असता मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात 4 हजार 326 रुपये, अकोला बाजारात 4254 रुपये, अमरावती बाजारात 4269 रुपये, वाशिम बाजारात 04 हजार 290 रुपये, तर जालना बाजारात 04 हजार 385 रुपयांचा दर मिळाला. विशेष म्हणजे सोयाबीनची खरीप हंगाम 2024 25 साठी किमान आधारभूत किंमत ही 4892 प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामानाने यावर्षी तसा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
संकलन : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन विद्यमाने बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्ष (ही माहिती १४ जुलै रोजीच्या बाजार अहवालावरून देण्यात आली आहे.)