आज राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद होती. केवळ दोनच बाजार समितीमध्ये आज ज्वारीची 83 क्विंटल आवक झाली आवक झाली. यात सर्वसाधारण आणि रब्बी ज्वारीचा समावेश आहे.
आज 21 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार रविवार असल्याने केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कुर्डूवाडी बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीची 80 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला कमीत कमी 26 रुपये तर सरासरी 300 रुपये दर मिळाला त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीची तीन क्विंटल आवक झाली या ज्वारीला कमीत कमी 2400 रुपये तर सरासरी 2400 रुपये दर मिळाला.
दरम्यान कालच्या काही निवडक बाजारभावांचा विचार केला तर सर्वसाधारण ज्वारीला 2100 रुपयांच्या आत भाव मिळाला. रब्बी ज्वारीला 2700 पर्यंत भाव मिळाला होता, हा भाव पैठण बाजार समितीत मिळाला होता, मात्र आज 300 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आलं. तसेच परभणी बाजार समितीत टाळकी ज्वारीची एकूण क्विंटल ची आवक झाली होती, या ज्वारीला सरासरी 2500 रुपये दर मिळाला होता.
असे आहेत आजचे ज्वारीचे दर
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
21/04/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | रब्बी | क्विंटल | 3 | 2400 | 2400 | 2400 |
सोलापूर | --- | क्विंटल | 80 | 2600 | 4000 | 3300 |