Join us

Onion Market : रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा इतर बाजार समितीत किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 6:46 PM

पणन मंडळाच्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 47 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

आज रविवार असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये दिला व प्रक्रिया बंद होती, मात्र काही निवडक बाजार समितीमध्ये आज कांदा लिलाव प्रक्रिया पार पडली. पणन मंडळाच्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 47 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक अहमदनगर जिल्ह्यात दिसून आली.

आज 21 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 14 हजार क्विंटल आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला राहुरी बाजार समितीत सरासरी 800 रुपये राहता बाजार समितीत सरासरी तेराशे रुपये दर मिळाला लाल कांद्याला धाराशिव बाजार समितीत सरासरी तेराशे रुपये तर भुसावळ बाजार समितीत 1400 रुपये दर मिळाला.

तसेच पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये दर मिळाला. वाई बाजार समिती सरासरी 1100 रुपये, मंगळवेढा बाजार समितीत सरासरी 1200 रुपये असा दर मिळाला. दरम्यान आज पैठण बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार रुपये पारनेर बाजार समितीत 1150 रुपये तर रामटेक बाजार समितीत सर्वाधिक 1500 रुपयांचा दर मिळाला आहे.

असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/04/2024
राहूरी---क्विंटल110861001500800
दौंड-केडगाव---क्विंटल482540017501400
राहता---क्विंटल210820016001300
धाराशिवलालक्विंटल61100016001300
भुसावळलालक्विंटल82120016001400
पुणेलोकलक्विंटल1466750015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18130014001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल4373001400850
वाईलोकलक्विंटल1570014001100
मंगळवेढालोकलक्विंटल860013001200
पैठणउन्हाळीक्विंटल113415013241000
पारनेरउन्हाळीक्विंटल1334440015001150
रामटेकउन्हाळीक्विंटल28140016001500
टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनाशिक