आजच्या बाजार अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोच्या दरात काही बाजार समित्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज द्राक्षाला सरासरी एक हजारपासून ते सात हजार पर्यंत गेल्याचे दिसून आलं. त्यानंतर टोमॅटोचा दर पाहिला असता सरासरी आठशे रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. त्यामुळे टोमॅटोच्या दराबाबत देखील शेतकर्यांच्या पदरी निराशा पडत आहे.
असे आहेत द्राक्ष आणि टोमॅटोचे बाजारभाव
21 फेब्रुवारीच्या दर अहवालानुसार सोलापूर बाजार समितीत वैशाली जातीच्या टोमॅटोला कमीत कमीत 400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर सरासरी 1000 रुपये मिळाला. पुणे बाजार समितीत टोमॅटो प्रति क्विंटलला कमीत कमीत 1000 तर सरासरी 1500 भाव मिळाला. नागपूर बाजार समितीत प्रति क्विटंलला 1200 रुपये बाजारभाव मिळाला. तर सरासरी 1425 बाजारभाव मिळाला. यानुसार नागपूर बाजार समितीत दीडशे रुपयांची घसरण पहायला मिळाली. तर जळगाव बाजार समितीमध्ये द्राक्षाला कमीत कमी 3000 रुपये तर सरासरी 3500 बाजारभाव मिळाला. धाराशिव बाजार समितीमध्ये कमीत कमी 1000 रुपये बाजार मिळाला. तर सरासरी 2250 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत द्राक्षाला कमीत कमी 2000 रुपये तर सरासरी 7000 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 4500 रुपये बाजारभाव मिळाला. त्यानुसार पुणे बाजार समितीत कालच्या दरापेक्षा आज 250 रुपयांची घसरण पहायला मिळाली.
फळांचे बाजारभाव असे होते.... आज 21 फेब्रुवारी फळ बाजार अहवालानुसार सोलापूर बाजार समितीत डाळींबची 365 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 4400 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत कलिंगडची 959 क्विंटल इतकी आवक झाली. या बाजार समितीत प्रतिक्विंटलला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1500 रुपये बाजार भाव मिळाला. कोल्हापूर बाजार समितीत मोसंबीला कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 3000 रुपये भाव मिळाला. नागपूर बाजार समिती नंबर 1 संत्रीची 3000क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 1600 बाजार मिळाला. तर सरासरी 2200 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत स्ट्रॉबेरीला कमीत कमी 5000 तर सरासरी 6500 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत केळीस कमीत कमी 800 रुपये ते सरासरी 1200 रुपये बाजार भाव मिळाला.