Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव बाजार समितीत कांदा घसरला, आज कुठे, काय बाजारभाव मिळाला? 

लासलगाव बाजार समितीत कांदा घसरला, आज कुठे, काय बाजारभाव मिळाला? 

Latest News 21 Feb 2024 todays Onion Market Price In Nashik and maharashtra | लासलगाव बाजार समितीत कांदा घसरला, आज कुठे, काय बाजारभाव मिळाला? 

लासलगाव बाजार समितीत कांदा घसरला, आज कुठे, काय बाजारभाव मिळाला? 

सरकारच्या संभ्रमतेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून आज कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

सरकारच्या संभ्रमतेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून आज कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे केंद्र शासनाने निर्यात खुली झाल्याची घोषणा केल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला समाधानकारक भाव मिळू लागला होता. मात्र याबाबतचे नोटिफिकेशन अद्याप निघाले नाही. दुसरीकडे निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम असल्याचे देखील सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा दरात घसरण सुरु झाली असून आज लासलगाव बाजार समितीमध्ये दोनशे रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. काल लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी 1650 रुपये भाव मिळाला. मात्र आज 1451 रुपयांचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे सरकारच्या धोरणात शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसत आहे. 

आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 9 हजार 146 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1451 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला बाजार समिती 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 600 रुपये मिळाला तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. देवळा बाजार समितीत 2080 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 300 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 11 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1470 दर मिळाला. 

लासलगावसह पिंपळगाव बाजारसमितीत घसरण 

एकूणच कालच्या आजच्या दराचा जर विचार केला तर काल लासलगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलला 1650 रुपये भाव मिळाला होता. आज थेट दोनशे रुपयांची घसरण भाव 1451 रुपयांवर आला. तर पिंपळगाव बाजारसमितीमध्ये पोळ कांद्याला आज 1470 रुपये भाव मिळाला. मात्र आजच्या तुलनेत कालचा बाजारभाव 1600 रुपये होता. म्हणजे या बाजार समितीत देखील जवळपास 130 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 

राज्यातील कांदा बाजारभाव
सोलापूर बाजार समितीत केवळ 18 हजार 278    क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 200 रुपये दर मिळाला. आणि सरासरी दर 1300 रुपये मिळाला. मंगळवारी याच बाजार समितीत 1900 रुपये बाजारभाव मिळाला होता. म्हणजेच आज जवळपास 600 रुपयांची घसरण झाली. पुणे बाजार समितीत 13 हजार 227 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 600 रुपये दर मिळाला. आणि सरासरी दर देखील 1300 रुपये दर मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये आज लाल कांद्याची 7 हजार 567 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1750 दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 940 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 500 रुपये तर सरासरी केवळ 1350 रुपये दर मिळाला.


राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/02/2024
अकलुज---क्विंटल12550022001300
कोल्हापूर---क्विंटल279370024001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल94050022001350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7567150020001750
हिंगणा---क्विंटल3200030003000
बारामतीलालक्विंटल18140021211600
येवलालालक्विंटल1000060016001400
येवला -आंदरसूललालक्विंटल400050016501450
लासलगावलालक्विंटल914670016451451
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल550070015301300
नागपूरलालक्विंटल2000160022002050
सिन्नर - नायगावलालक्विंटल61050017001400
चांदवडलालक्विंटल320078516501450
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल589060016001450
दिंडोरी-वणीलालक्विंटल2087150023501851
देवळालालक्विंटल208030014401300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल244450024001450
पुणेलोकलक्विंटल1322760020001300
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4000120016221550
मंगळवेढालोकलक्विंटल14040025001500
कामठीलोकलक्विंटल24100020001500
नागपूरपांढराक्विंटल1360170023002150
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1100040018701470

Web Title: Latest News 21 Feb 2024 todays Onion Market Price In Nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.