Lokmat Agro >बाजारहाट > तासगाव बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे दर 

तासगाव बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे दर 

latest News 22 march Todays Soyabean market Price in market yard see details | तासगाव बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे दर 

तासगाव बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, लोकल, हायब्रीड आणि पिवळ्या सोयाबीनची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, लोकल, हायब्रीड आणि पिवळ्या सोयाबीनची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक घटत असून दुपारी चारवाजेपर्यंत बाजार समित्यांमध्ये 10 हजार क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले. बहुतके शेतकरी दुपारनंतर बाजार समित्यांमध्ये दाखल होत असल्याने आवक वाढत आहे. आज सोयाबीनला सरासरी 4300 रुपये बाजारभाव मिळाला. केवळ तासगाव बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 5060 रुपयांचा दर मिळाला. 

आज 22 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, लोकल, हायब्रीड आणि पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज अमरावती बाजार समितीत सर्वाधिक 4 हजार 972 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत 4195 रुपये दर मिळाला. धुळे बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनची 10 क्विंटलची आवक झाली. या सोयाबीनला 4195 रुपये दर मिळाला. 

दरम्यान चाळीसगाव बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला 4180 रुपये भाव मिळाला. तर नाशिक बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला 4315 रुपये भाव मिळाला. आज सर्वाधिक बाजार समित्यांमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. तासगाव बाजार वगळता कोणत्याही बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही. साधारण 4200 पासून ते 4400 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

असे आहेत आजचे सोयाबीनचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/03/2024
कारंजा---क्विंटल4500400546604330
सेलु---क्विंटल39410044914400
तुळजापूर---क्विंटल50442544254425
धुळेहायब्रीडक्विंटल10410041954195
अमरावतीलोकलक्विंटल4972425043654307
चाळीसगावपिवळाक्विंटल4310042004180
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल75420043204260
जिंतूरपिवळाक्विंटल134430043604311
गेवराईपिवळाक्विंटल10435043504350
परतूरपिवळाक्विंटल10425044154300
तेल्हारापिवळाक्विंटल250422543254305
देउळगाव राजापिवळाक्विंटल19400043014250
नांदगावपिवळाक्विंटल5300043154315
तासगावपिवळाक्विंटल22495051205060
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210426045004450
पाथरीपिवळाक्विंटल2430143014301
उमरखेडपिवळाक्विंटल120435045004400

 

Web Title: latest News 22 march Todays Soyabean market Price in market yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.