Join us

पुणे-मुंबईत घसरण, लासलगावला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 3:19 PM

मागील दोन दिवसांच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीमध्ये दोनशे रुपयांचा फरक असल्याचे चित्र आहे.

कांद्याचा प्रश्न बिकट होत चालला असून शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे कांदा निर्यात बंदी कायम असल्याने कांदा बाजारभावाची परिस्थिती जैसे थे आहे. आजचा बाजार अहवाल पाहिला असता मागील दोन दिवसांच्या तुलनेत लासलगाव बाजारसमिती मध्ये दोनशे रुपयांचा फरक असल्याचे चित्र आहे. काल लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी 1451 रुपये भाव मिळाला. मात्र आज 1670 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

आज 23 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 8 हजार 313 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1670 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला बाजार समिती 15 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 700 रुपये मिळाला तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत 12500 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1750 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 18 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1600 दर मिळाला. 

पुन्हा बाजारभावात बदल 

एकीकडे निर्यात खुली झाल्याच्या चर्चेननंतर भाव वाढत असल्याचे चित्र होते. मात्र हे चित्र काहीकाळच टिकू शकले. नंतर पुन्हा मार्केटमध्ये जैसे थे परिस्थिती दिसू लागली आहे. अशातच मागील दोन दिवस कुठे सरासरी एक हजार, बाराशे, चौदाशेपर्यंत प्रति क्विंटलला भाव मिळत होता. त्यानंतर आज लासलगाव बाजार समितीचा विचार केला असता काहीसा बदल पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये काल 

राज्यातील कांदा बाजारभाव

कोल्हापूर बाजार समितीत 4861 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 700 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत 16     हजार 156 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. आणि सरासरी दर देखील 1100 रुपये दर मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये आज लाल कांद्याची 9 हजार 757 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1400 रुपये तर सरासरी 1700 दर मिळाला. जळगाव बाजार समितीमध्ये 2016 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 450 रुपये तर सरासरी केवळ 1062 रुपये दर मिळाला.

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/02/2024
कोल्हापूर---क्विंटल486170022001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9757140020001700
येवलालालक्विंटल1500070018551650
येवला -आंदरसूललालक्विंटल500030018751675
लासलगावलालक्विंटल831380017921670
लासलगाव - निफाडलालक्विंटल3000100118001700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल12500100020161750
जळगावलालक्विंटल201645016751062
सिन्नर - नायगावलालक्विंटल64550018001600
चांदवडलालक्विंटल400078018501680
पेनलालक्विंटल300240026002400
दिंडोरी-वणीलालक्विंटल5846105120811521
देवळालालक्विंटल395035518001680
पुणेलोकलक्विंटल1615650017001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल4395001000750
कामठीलोकलक्विंटल2100020001500
कल्याणनं. १क्विंटल3160022001900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800030020001600
टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डशेती क्षेत्र