सर्वच शेत मालाला बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याबरोबरच कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी यंदा निराशाच पडलेली दिसून येत आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढ उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. अकोला बाजार समितीत कालच्या बाजारभावापेक्षा आज पुन्हा काही रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आज शनिवार असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचे चित्र होते. यावेळी बाजारात केवळ मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची आवक झाली होती. अकोला बाजार समितीत केवळ 66 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6930 रुपये तर सरासरी 7065 रुपये बाजारभाव मिळाला. काल याच बाजार समितीत 7090 रुपये बाजारभाव मिळाला होता. भद्रावती बाजार समितीत 360 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6150 रुपये तर सरासरी 6575 रुपये बाजारभाव मिळाला. यावल बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी सरासरी 6310 रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान भद्रावती, अकोला, उमरेड, देउळगाव राजा, यावल, वरोरा-माढेली आदी बाजार समित्यांमध्ये जवळपास 03 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक देउळगाव राजा या बाजार समितीत झाली. शिवाय इथं बाजारभाव देखील सर्वाधिक मिळाला. तर सर्वात कमी दर यावल बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला मिळाला. तर भद्रावती बाजार समितीमध्ये त्यापाठोपाठ 6 हजार 575 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
असे आहेत राज्यातील कापूस दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
24/02/2024 | ||||||
भद्रावती | --- | क्विंटल | 360 | 6150 | 7000 | 6575 |
अकोला | लोकल | क्विंटल | 66 | 6930 | 7200 | 7065 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 427 | 6600 | 7170 | 6850 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 2400 | 7000 | 7600 | 7300 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 600 | 6400 | 7150 | 6800 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 70 | 6070 | 6640 | 6310 |