Join us

Tomato Market : टोमॅटो दरात घसरण, द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 7:11 PM

आजच्या दर अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

महाराष्ट्रातील महत्वाचे पीक असलेल्या द्राक्ष आणि टोमॅटो पिकाच्या बाजारभावात चढ उतार कायम आहे. अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. एकीकडे द्राक्ष निर्यात वाढत असली तरीही मात्र स्थानिक बाजार पेठांमध्ये मात्र काहीसा असमाधानकारक बाजारभाव द्राक्षांना मिळत आहे. आजच्या दर अहवालानुसार द्राक्ष पिकाला क्विंटलमागे सरासरी 03 हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. तर टोमॅटोच्या दरात दोन दिवसांच्या तुलनेत आज घसरण पहायला मिळाली. 

असे आहेत द्राक्ष बाजारभाव 

आज 28 फेब्रुवारीच्या दर अहवालानुसार महत्वाच्या बाजार समित्या मिळून जवळपास पाच हजार क्विंटल द्राक्षांची आवक झाली. यात 1298 क्विंटलची सर्वाधिक आवक ही मुंबई - फ्रुट मार्केटमध्ये झाली. तर सर्वात कमी म्हणजेच 2 क्विंटलची आवक राहता बाजार समितीत झाली. पुणे बाजार समितीत 760 क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 6500 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तर राहता बाजार समितीत सर्वात कमी म्हणजेच 2 हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला. जळगाव बाजार समितीत नाशिकच्या द्राक्षांना सरासरी 2800 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

असे आहेत आजचे टोमॅटो बाजारभाव 

आज बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या वैशाली, लोकल, हायब्रीड, नंबर 01 या वाणांची आवक झाली. पुणे आणि मुंबई बाजार समिती सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्याचे दिसून आले. आज पनवेल बाजार समितीत नंबर एक टोमॅटो वाणाला सर्वाधिक क्विंटलमागे सरासरी 2100 रुपयांचा बाजारभाव मिळाला. त्यांनतर सर्वात कमी बाजारभाव हा सोलापूर, जळगाव या बाजार समितीत वैशाली वाणाला मिळाला. तसेच पंढरपूर बाजार समितीत हायब्रीड या वाणाला आठशे रुपये बाजारभाव मिळाला. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डद्राक्षेटोमॅटोनाशिक