आज रविवार असल्याने बहुतांश बाजार समित्यामध्ये लिलाव बंद पाहायला मिळाले. मात्र काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले. आजच्या पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्याला प्रति क्विंटलला 1400 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर आज पुणे बाजार समितीत सर्वाधिक 22 हजार 258 क्विंटलची आवक झाली.
आज 25 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार पुणे बाजारसमितीमध्ये कमीत कमी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर भुसावळ बाजार समिती 24 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 1200 रुपये मिळाला तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. पुणे बाजार समिती खालोखाल पारनेर बाजार समितीत सर्वाधिक 17 हजार 428 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 400 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1725 रुपये दर मिळाला. मंगळवेढा बाजार समितीमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ 14 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1400 दर मिळाला.
साधारण सातारा, राहता, जुन्नर, मंगळवेढा, पुणे, पारनेर, भुसावळ, पुणे खडकी, पुणे मोशी आदी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. या बाजार समित्यांमध्ये जवळपास 48 हजार क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक 2200 रुपयांचा बाजारभाव हा जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत पाहायला मिळाला. तर सर्वात कमी 900 रुपयांचा बाजारभाव पुणे मोशी बाजार समितीत मिळाला. एकूणच आज सरासरी बाजारभाव मागील दोन दिवसांच्या तुलनेत समाधानकारक बाजारभाव मिळाला.
असे आहेत आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
25/02/2024 | ||||||
सातारा | --- | क्विंटल | 255 | 1000 | 2000 | 1500 |
राहता | --- | क्विंटल | 963 | 300 | 2400 | 1600 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 6216 | 1000 | 3000 | 2200 |
पारनेर | लाल | क्विंटल | 17428 | 400 | 2700 | 1725 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 24 | 1200 | 1600 | 1500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 22258 | 800 | 2400 | 1600 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 22 | 1000 | 1500 | 1250 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 827 | 500 | 1300 | 900 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 14 | 600 | 1800 | 1400 |