Join us

कांदा उत्पादक शेतकरी संकटात, लासलगावला प्रति क्विंटलला हजार रुपये दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 5:09 PM

सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सतत घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा निराशा होत आहे.

कांदा दरात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या जीवाची लाही लाही झाली आहे. एकीकडे तीन ते साडे तीन हजार रुपयांनी क्विंटल कांदा दर होता. आज मात्र हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव पुन्हा घसरले असून, कांद्याला सरासरी केवळ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सतत घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा निराशा होत आहे.

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 8 हजार 500 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी केवळ 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, म्हणजेच कालच्यापेक्षा आज जवळपास दोनशे रुपयांची घसरण झाली. तर येवला बाजार समिती जवळपास 16 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर दोनशे रुपये मिळाला तर सरासरी 900 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला, म्हणजेच आठ दिवसांत येवल्यात तब्बल पाचशे रुपयांनी दर खाली आला. 

कांदा दरात कमालीची घसरण झाली असून कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहे. असे असताना मागील आठ दिवसांच्या कालावधीत जवळपास सातशे ते आठशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. आज केवळ हजार आणि नऊशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे.  

असे आहेत राज्यातील बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/01/2024
कोल्हापूर---क्विंटल113683001500900
अकोला---क्विंटल1165120017001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल33072901250725
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल237120020001500
खेड-चाकण---क्विंटल15080015001200
विटा---क्विंटल50100016001350
सातारा---क्विंटल15770014001000
हिंगणा---क्विंटल2160016001600
येवलालालक्विंटल160002001219900
लासलगावलालक्विंटल850050012121000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1380035012401040
जळगावलालक्विंटल47452501177925
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल2000055013021150
पंढरपूरलालक्विंटल37120016001100
नागपूरलालक्विंटल910100016001450
सिन्नर - नायगावलालक्विंटल152020011611000
चांदवडलालक्विंटल1000040014001030
मनमाडलालक्विंटल80002001186900
सटाणालालक्विंटल50201001260950
पेनलालक्विंटल267300032003000
भुसावळलालक्विंटल6960012001000
दिंडोरी-वणीलालक्विंटल4215105118011450
वैजापूरलालक्विंटल10505001205800
देवळालालक्विंटल420025013801200
उमराणेलालक्विंटल1750075113701150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल80192001400800
पुणेलोकलक्विंटल1781250017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल8100017001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल134480012001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल450080012871000
मंगळवेढालोकलक्विंटल16810015001180
कामठीलोकलक्विंटल34150025002000
कल्याणनं. १क्विंटल3200024002200
नागपूरपांढराक्विंटल910120016001500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1260035114881125
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6041100020001500
सटाणाउन्हाळीक्विंटल75032018901460
टॅग्स :नाशिककांदामार्केट यार्ड