Join us

Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे मिळाला इतका दर   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 5:45 PM

लाल कांद्याची आवक हळूहळू घटू लागली असून जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागली आहे.

लाल कांद्याची आवक हळूहळू घटू लागली असून जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागली आहे. आज राज्यातील बाजार समित्यांचा विचार केला तर जवळपास 01 लाख 30 हजार क्विंटल आवक झाल्याचे दिसून आले. आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला आहे. तर उन्हाळ कांद्याला सरासरी हजार रुपयापासून ते 1600 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज 27 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1 लाख 30 हजार 470 क्विंटल आवक झाली. आज सर्वाधिक 14 हजार 776 क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीत झाली. या बाजार समितीत सरासरी 1400 रुपये दर मिळाला. आज लासलगाव बाजार समितीत केवळ उन्हाळ कांद्याची 4500 क्विंटल इतकी आवक झाली. तर सरासरी दर 1525 रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज समाधानकारक भाव मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1601 रुपये दर मिळाला. 

एकूणच मागील काही दिवसांच्या तुलनेत समाधानकारक दर मिळू लागला आहे. मात्र केवळ उन्हाळ कांद्याच्या बाबतीत हे होत आहे. दुसरीकडे लाल कांद्याचा हंगाम संपत आला असता देखील लाल कांद्याला अपेक्षित असा बाजारभाव मिळू शकलेला नाही. आज देखील लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक झालेली नाही. 

असे आहेत कांद्याचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/03/2024
अकलुज---क्विंटल25530017001000
कोल्हापूर---क्विंटल308850019001300
अकोला---क्विंटल22570013001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93450016001050
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8610120017001450
खेड-चाकण---क्विंटल6000100018001600
मंचर- वणी---क्विंटल522120016001400
सातारा---क्विंटल285100015001250
कराडहालवाक्विंटल150100015001500
सोलापूरलालक्विंटल1477620023001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल51960018001200
जळगावलालक्विंटल53755015001100
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल210050515571320
नागपूरलालक्विंटल1800100015001375
सिन्नरलालक्विंटल253040015251450
सिन्नर - नायगावलालक्विंटल62650015701475
मनमाडलालक्विंटल30070014861350
भुसावळलालक्विंटल16100015001200
यावललालक्विंटल278094012901070
देवळालालक्विंटल31050013751300
उमराणेलालक्विंटल500055114251250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल288640018501125
पुणेलोकलक्विंटल1301650017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल2670013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16120015001350
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1300120015721350
वाईलोकलक्विंटल1870015001100
मंगळवेढालोकलक्विंटल5510014001230
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
येवलाउन्हाळीक्विंटल150031114811426
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100060015001451
नाशिकउन्हाळीक्विंटल142580017001450
लासलगावउन्हाळीक्विंटल438670015901525
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4600100016001500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल646470016131400
संगमनेरउन्हाळीक्विंटल57212001751975
चांदवडउन्हाळीक्विंटल4200120416801550
मनमाडउन्हाळीक्विंटल100048515821450
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700040017011601
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल408770015851500
पारनेरउन्हाळीक्विंटल915940018001300
गंगापूरउन्हाळीक्विंटल170116014551309
देवळाउन्हाळीक्विंटल110060015401430
उमराणेउन्हाळीक्विंटल950065116651450
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिकशेती क्षेत्र