आज रविवार असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 49 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक 17 हजार क्विंटल सर्वसाधारण कांद्याची आवक झाली. त्या खालोखाल उन्हाळ कांद्याची नऊ हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1425 रुपये दर मिळाला.
आज 28 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील नऊ ते दहा बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. आज राहूरी, मंचर, राहता या बाजारात सर्वसाधारण कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1425 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला मिळालेला हा दर सर्वाधिक होता. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत आलेल्या चिंचवड कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला.
तर आज भुसावळ बाजारात 90 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये, पुणे -पिंपरी बाजारात 1350 रुपये, पुणे-मोशी बाजारात 900 रुपये द्र मिळाला. आज केवळ पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 9952 क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला.
असे आहेत आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
28/04/2024 | ||||||
राहूरी | --- | क्विंटल | 9691 | 100 | 1600 | 850 |
मंचर | --- | क्विंटल | 5192 | 1200 | 1620 | 1425 |
राहता | --- | क्विंटल | 2454 | 200 | 1650 | 1100 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 7492 | 900 | 1710 | 1350 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 90 | 1100 | 1500 | 1300 |
पुणे | लोकल | क्विंटल | 13818 | 600 | 1600 | 1100 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 11 | 1200 | 1500 | 1350 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 703 | 400 | 1400 | 900 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 9952 | 300 | 1600 | 1300 |