Join us

Onion Market : कांद्याची आवक वाढली, आज लासलगावला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 6:44 PM

आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समिती कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

कांदा बाजारभावाने शेतकऱ्यांना अक्षरशः रडकुंडीला आणले आहे. कांदा निर्यातीबाबतचे धोरण दीर्घकालीन असणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांच्या तुलनेत मागील दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत बाजारभाव सतराशे रुपयांपर्यंत पोहचल्याचे चित्र आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समिती कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1740 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. 

आज 28 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, येवला, लासलगाव-विंचूर, निफाड, उमराणे, चांदवड, मुंगसे, येवला अंदरसूल याच बाजार समित्यांचा विचार केला तर जवळपास एक लाख दहा हजार टनाहून अधिक कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक येवला आणि मालेगाव मुंगसे बाजार समितीत बाजार समितीत पाहायला मिळाला. तर राज्यातील सर्वाधिक आवक सोलापूर बाजार समितीत एकूण 55 हजार टन इतकी आवक झाली. तर सर्वात खालोखाल कल्याण बाजार समितीत नंबर एक कांद्याची आवक झाली. एकूण मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज आवक वाढल्याचे दिसून आले. 

तर आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1740 रुपयांचा बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजार समितीत सरासरी 1300 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत एकूण 23 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. तर सर्वात कमीत बाजारभाव म्हणजेच 1200 रुपयांचा बाजारभाव मिळाला. आज सर्वाधिक बाजारभाव कल्याण बाजार समितीत नंबर एकच्या कांद्याला 2100 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर लोकल कांद्याला 1900 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये मिळाला. 

आजचे राज्यातील कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/02/2024
कोल्हापूर---क्विंटल629270022001400
अकोला---क्विंटल445120022001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल187280020001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल14519160022001900
मंचर- वणी---क्विंटल450110021101625
सोलापूरलालक्विंटल5565330025001300
बारामतीलालक्विंटल116030019501500
येवलालालक्विंटल1600060018501650
येवला -आंदरसूललालक्विंटल600025018201675
लासलगाव - निफाडलालक्विंटल532090018201720
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1450050019011750
जळगावलालक्विंटल156157517251230
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1600050018451650
सिन्नर - नायगावलालक्विंटल65550018611700
संगमनेरलालक्विंटल881220023511275
चांदवडलालक्विंटल600082619711680
मनमाडलालक्विंटल225040018341650
कोपरगावलालक्विंटल478050019011700
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल694050018751625
पेनलालक्विंटल468180020001800
पारनेरलालक्विंटल2783230021001500
भुसावळलालक्विंटल14100020001500
देवळालालक्विंटल620035017301625
उमराणेलालक्विंटल1350070118621550
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल51970021001400
पुणेलोकलक्विंटल2311750019001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल4110015001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1380020001400
वाईलोकलक्विंटल20100020001600
मंगळवेढालोकलक्विंटल5430022001700
कल्याणनं. १क्विंटल3200022002100
नाशिकपोळक्विंटल298060021001700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2000050020401700

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक