Join us

Onion Market : लाल कांद्याला 'इथे' मिळाला सर्वात कमी दर, वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 8:10 PM

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 43 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

Onion Rate : आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Market Yard) कांद्याची एक लाख 43 हजार क्विंटल इतकी आवक झाली. गेले काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात स्थिरता असल्याचे चित्र आहे. आज कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून ते 1800 रुपयांपर्यंत सरासरी दर (Onion Market Price) मिळाला. 

आज 28 मे 2024 रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला 1000 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. नांदुरा बाजार समितीत (Nandura Market) अवघा पाचशे रुपये क्विंटल मागे दर मिळाला. लाल कांद्याला आज सरासरी 1400 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पेन बाजार समिती सर्वाधिक 2400 रुपयांचा दर मिळाला. तर जळगाव (Jalgaon Market) बाजार समितीत अवघा 950 रुपये दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. अकोले आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. येवला अंदरसुल बाजार समितीत 1450 रुपये, लासलगाव बाजार समितीत 1551 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीत 1750 रुपये, सिन्नर बाजार समितीत 1800 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1951 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/05/2024
कोल्हापूर---क्विंटल389970026001500
अकोला---क्विंटल39570014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल153340016001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9556150023001900
खेड-चाकण---क्विंटल225120018001500
दौंड-केडगाव---क्विंटल200580025001800
सातारा---क्विंटल106150022001850
नांदूरा---क्विंटल15300500500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5010110028102400
कराडहालवाक्विंटल24950021002100
सोलापूरलालक्विंटल1184910031001650
जळगावलालक्विंटल7685001575950
नागपूरलालक्विंटल2000100016001450
नंदूरबारलालक्विंटल161138016301580
पेनलालक्विंटल399240026002400
साक्रीलालक्विंटल320095019501750
भुसावळलालक्विंटल26130018001500
हिंगणालालक्विंटल1150015001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल270960023001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100020001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल100130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल39850020001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2100140017201600
जामखेडलोकलक्विंटल135410025001300
कल्याणनं. १क्विंटल3200023002150
नागपूरपांढराक्विंटल940110017001550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50040016011450
लासलगावउन्हाळीक्विंटल44440020511551
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल256090022001750
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1071070020531750
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000070020501650
अकोलेउन्हाळीक्विंटल324230026001900
सिन्नरउन्हाळीक्विंटल135950020311800
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल46550019411800
संगमनेरउन्हाळीक्विंटल473350026511575
चांदवडउन्हाळीक्विंटल460091622211800
मनमाडउन्हाळीक्विंटल150050019841500
सटाणाउन्हाळीक्विंटल1077550021501800
कोपरगावउन्हाळीक्विंटल574450019751675
कोपरगावउन्हाळीक्विंटल3936100018901705
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500050024251951
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल270970019211750
देवळाउन्हाळीक्विंटल368140021001800
राहताउन्हाळीक्विंटल290935024001700
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र