Join us

यंदाही कोकणच्या राजाची अमेरिकावारी लासलगावमार्गे, तब्बल 28 टन आंबे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 1:20 PM

मागील वर्षी एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली होती.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रात आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ७५०० बॉक्समधून २८ टन आंबा अमेरिकेला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी दिली. 

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी यंदाही लासलगाव मार्गे सुरू झाली असून गुरुवारी २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहेत. मागील वर्षी एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची विक्री झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया येथे होऊ लागली आहे. 

लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे कांद्याबरोबर मसाले व आंब्यावरही विकिरण प्रक्रिया केली जाते.

विकिरण प्रक्रिया म्हणजे काय?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ये मात्रा विकिरण मा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्या किया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. कीड रोखण्यासाठी हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीआंबामार्केट यार्डअमेरिकारत्नागिरी