Join us

Sorghum Market : पांढरी ज्वारी चकाकली! कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 6:12 PM

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 9 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 9 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली. आठवड्याचा पहिला दिवस असला तरीही आवक घटल्याचे दिसून आले. आजच्या बाजार अहवालांनुसार ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 4401 रुपये दर मिळाला. आज कुठल्या ज्वारीला कुठे काय भाव मिळाला, हे थोडक्यात पाहुयात.... 

आज 29 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक हायब्रीड ज्वारीची आवक झाली. त्यानंतर शाळु आणि लोकल ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1705 रुपये ते 3300 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण ज्वारीला सर्वाधिक दर करमाळा बाजार समितीत मिळाला. 

आज दादर ज्वारीला सरासरी 2461 रुपये ते 3250 दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3550 रुपये दर मिळाला. तर लोकल ज्वारीला सरासरी 2050 रुपये 4200 रुपये दर मिळाला. मुंबई बाजारात सर्वाधिक दर मिळाला. मालदांडी ज्वारीला सरासरी 2900 रुपये ते 3650 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात सायंकाळी सहा वाजेपर्यंत आवक झाली नसल्याचे दिसून आले. 

पांढऱ्या आणि शाळू ज्वारीला काय बाजारभाव 

आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 4401 रुपये दर मिळाला. आजच्या दिवसातील पांढऱ्या ज्वारीला सर्वाधिक 4401 रुपयांचा दर मुरूम बाजारात मिळाला. तर आज शाळू ज्वारीच्या दरात घसरण झाली असून सांगली बाजारात 4300 रुपये दर मिळाला. तर सरासरी 2100 रुपये ते 4300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/04/2024
कारंजा---क्विंटल150153022201705
श्रीरामपूर---क्विंटल7150020001900
करमाळा---क्विंटल584250042253300
राहता---क्विंटल4185021001925
धुळेदादरक्विंटल4210025802461
जळगावदादरक्विंटल95200032503250
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल60218127822569
अमळनेरदादरक्विंटल400215025652565
अकोलाहायब्रीडक्विंटल265175024802125
धुळेहायब्रीडक्विंटल186195021702136
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल195210021502125
सांगलीहायब्रीडक्विंटल340318034003290
नागपूरहायब्रीडक्विंटल8340036003550
वाशीम - अनसींगहायब्रीडक्विंटल60205021502100
अमळनेरहायब्रीडक्विंटल1700200024002400
दिग्रसहायब्रीडक्विंटल51190020301995
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल9300030003000
रावेरहायब्रीडक्विंटल41182520501945
धरणगावहायब्रीडक्विंटल270210022002175
यावलहायब्रीडक्विंटल13251029002750
अमरावतीलोकलक्विंटल213255028502700
मुंबईलोकलक्विंटल671250056004200
कोपरगावलोकलक्विंटल8200023922050
सोलापूरमालदांडीक्विंटल5308030803080
जामखेडमालदांडीक्विंटल568270046003650
मंगळवेढामालदांडीक्विंटल67240031002900
परांडामालदांडीक्विंटल13285030002900
चाळीसगावपांढरीक्विंटल800200021572100
दौंड-पाटसपांढरीक्विंटल2320032003200
औराद शहाजानीपांढरीक्विंटल52260033002950
मुरुमपांढरीक्विंटल104440144014401
तुळजापूरपांढरीक्विंटल105250036003250
पाथरीपांढरीक्विंटल24190026012200
पालमपांढरीक्विंटल40300130013001
किल्ले धारुरपिवळीक्विंटल6300036003500
माजलगावरब्बीक्विंटल259190027752500
जिंतूररब्बीक्विंटल10227524002300
किल्ले धारुररब्बीक्विंटल43193030002900
जालनाशाळूक्विंटल1851200040002800
सांगलीशाळूक्विंटल250350051004300
चिखलीशाळूक्विंटल21210025002300
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल19210024712286
परतूरशाळूक्विंटल21190022502100
देउळगाव राजाशाळूक्विंटल25200025002200
टॅग्स :ज्वारीशेतीमार्केट यार्डसांगली