Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : राज्यभरात कांद्याची आवक घटली, लासलगावला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

Onion Market : राज्यभरात कांद्याची आवक घटली, लासलगावला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

Latest news 29 march todays onion market price in nashik and maharashtra | Onion Market : राज्यभरात कांद्याची आवक घटली, लासलगावला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

Onion Market : राज्यभरात कांद्याची आवक घटली, लासलगावला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

आज राज्यभरातील बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांदा कमी प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले.

आज राज्यभरातील बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांदा कमी प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक घटली असून रोज दोन लाखाहून अधिक होणारी कांदा आवक पावणेदोन लाखांवर आली आहे. आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक 63 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज देखील उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांदा कमी प्रमाणात आल्याचे दिसून आले. तर आज सरासरी कांद्याला 1300 रुपयापर्यंत भाव मिळाला. 

आज 29 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पुणे बाजार समितीत सर्वाधिक 21 हजार क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. तर पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 14 हजार 399 क्विंटल आवक झाली. आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची 4792 क्विंटल आवक झाली. तर विंचूर बाजार समितीत 5800 क्विंटल आवक झाली. या दोन्ही बाजार समित्यांमिळून दहा हजार क्विंटल कांदा लिलावात दाखल झाला होता. 

आज लासलगाव बाजार समिती उन्हाळ कांद्याला सरासरी 1520 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत आलेल्या लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. आज दुपारी चार वाजेपर्यंत केवळ १४ बाजार समित्यांमध्ये कांदा आवक झाल्याचे पणन मंडळाच्या अधिकृत माहितीवरून दिसून आले. आज सर्वाधिक 1600 रुपयांचा बाजारभाव हा सर्वसाधारण कांद्याला खेड-चाकण बाजार समितीत मिळाला. तर अकलूज बाजार समितीत केवळ 1000 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/03/2024
अकलुज---क्विंटल17030018001000
कोल्हापूर---क्विंटल693370021001400
अकोला---क्विंटल530100016001300
खेड-चाकण---क्विंटल75130018001600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल9052100018101450
भुसावळलालक्विंटल21100015001400
पुणेलोकलक्विंटल2101650017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10100016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल51470015001100
वाईलोकलक्विंटल2070015001100
मंगळवेढालोकलक्विंटल5014015501300
लासलगावउन्हाळीक्विंटल479270016111520
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल580090016001500
पारनेरउन्हाळीक्विंटल1439940018001300

Web Title: Latest news 29 march todays onion market price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.