Join us

Onion Market : लाल- उन्हाळ कांदा दरात काय बदल झालाय? जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 7:34 PM

Todays Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख तीस हजार 647 क्विंटलची आवक झाली.

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख तीस हजार 647 क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला (Red Onion) सरासरी 1200 रुपये पासून 1825 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सर्वाधिक दर हा साक्री बाजार समितीत (Sakri Mandi) मिळाल्याचे दिसून आलं. तर आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 29 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याची (Onion Market price) 9 हजार क्विंटल ची आवक झाली. त्यात बारामती बाजार समिती 1400 रुपये, धुळे बाजार समिती 1600 रुपये, जळगाव बाजार समितीत 1200 रुपये, नागपूर बाजार समिती 1400 रुपये तर साक्री बाजार समितीत 1825 रुपयांचा दर मिळाला. तर आज लोकल कांद्याला सरासरी 1300 रुपयांपासून 1800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर कामठी बाजार समिती 02 हजार रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याचे आवक झाल्याचे दिसून आले.

आज उन्हाळ कांद्याची दिवसभरात 93 हजार क्विंटल ची आवक झाली यात अहमदनगर बाजार समितीत 23 हजार तर नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 70 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 1650 रुपये, नाशिक बाजारात 1600 रुपये, लासलगाव बाजार समिती 1380 रुपये, लासलगाव विंचुर बाजार समिती 02 हजार रुपये तर लासलगाव निफाड बाजार समितीत 2100 रुपये आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत देखील 2100 रुपयांचा दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समितीच्या तुलनेत लासलगाव बाजारात मात्र दर जैसे थे असल्याचे दिसून आले.

असे आहेत आजचे कांद्याचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/05/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल2299835026561503
अकोला---क्विंटल25680014001200
अमरावतीलालक्विंटल33960020001300
चंद्रपुर---क्विंटल494150018001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल118980016001200
धुळेलालक्विंटल350060019701713
जळगावलोकलक्विंटल2100163018501700
जळगावलालक्विंटल696102518391400
जालना---क्विंटल9051501300800
कोल्हापूर---क्विंटल429070030001700
मंबई---क्विंटल8792150024001950
नागपूरलोकलक्विंटल34150025002000
नागपूरलालक्विंटल1500100016001450
नागपूरपांढराक्विंटल1000110017001550
नाशिकउन्हाळीक्विंटल6973964321891836
पुणे---क्विंटल880150023551975
पुणेलोकलक्विंटल8045110019501525
पुणेलालक्विंटल64430020001400
सांगलीलोकलक्विंटल253270024001550
सातारा---क्विंटल327150022001750
सातारालोकलक्विंटल20100023001700
सोलापूर---क्विंटल28540023001300
सोलापूरलोकलक्विंटल8240030001800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)130647
टॅग्स :कांदाशेतीनाशिकशेती क्षेत्रमार्केट यार्ड