Lokmat Agro >बाजारहाट > कुठे आवक घटली, कुठे वाढली? कांद्याला काय बाजारभाव मिळाला? 

कुठे आवक घटली, कुठे वाढली? कांद्याला काय बाजारभाव मिळाला? 

Latest news 30 January todays onion price in Nashik Maharashtra | कुठे आवक घटली, कुठे वाढली? कांद्याला काय बाजारभाव मिळाला? 

कुठे आवक घटली, कुठे वाढली? कांद्याला काय बाजारभाव मिळाला? 

आजचा कांदा बाजारभाव कसा होता, कालच्या पेक्षा आज काही फरक पडलाय का? ही जाणून घ्या..

आजचा कांदा बाजारभाव कसा होता, कालच्या पेक्षा आज काही फरक पडलाय का? ही जाणून घ्या..

शेअर :

Join us
Join usNext

निर्यातबंदीनंतर कांदा दरात सातत्याने घसरण सुरु आहे. अशातच काल लासलगाव बाजार समिती आवारात आंदोलन देखील करण्यात आले. मात्र अशा स्थितीतही कांदा बाजारभाव जैसे थे आहेत. मागील दोन तीन दिवसांचा विचार केला तर काहीसा बदल आज दिसून येत आहे. दोन दिवसांपासून नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. आज अकराशे रुपयांवर बाजारभाव पोहचला आहे. 

लासलगाव बाजार समितीमध्ये साधारण 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत 500 रुपये तर सरासरी 1160 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. येवला -आंदरसूल बाजार समितीत 12 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1150 रुपये भाव मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजार समितीत 11 हजार 200 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 450 रुपये तर सरासरी 1151 रुपये दर मिळाला. जवळच्याच पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 10 हजार 800 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी 400 रुपये तर 1100 रुपये सरासरी दर मिळाला. 

राज्यभरातील निवडक बाजार समित्यांचा बाजारभाव 

तर राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत आज 23 31 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 275 तर सरासरी 688 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत 2838 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी तीनशे रुपये तर सरासरी 627 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समिती 1347 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 900 रुपये बाजार भाव मिळाला. आज सर्वाधिक बाजारभाव पेन बाजार समितीत सरासरी 2400 रुपयांपर्यंत मिळाला. तर सर्वात कमी बाजार भाव हा जळगाव बाजार समितीत सरासरी 627 रुपये मिळाला.

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/01/2024
कोल्हापूर---क्विंटल267640017001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23312751100688
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1183120020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1006490015001200
खेड-चाकण---क्विंटल25060014001200
दौंड-केडगाव---क्विंटल101030015001000
येवला -आंदरसूललालक्विंटल1200030013121150
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1120045013001151
जळगावलालक्विंटल28383001125627
नंदूरबारलालक्विंटल381615975830
सिन्नर - नायगावलालक्विंटल42620012601175
मनमाडलालक्विंटल31002501240900
पेनलालक्विंटल375240026002400
भुसावळलालक्विंटल5050012001000
राहतालालक्विंटल78430014001050
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल45662001500850
पुणेलोकलक्विंटल134274001400900
पुणे-मोशीलोकलक्विंटल4674001000700
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल300090013411150
कामठीलोकलक्विंटल9150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1080040014521100

Web Title: Latest news 30 January todays onion price in Nashik Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.