Lokmat Agro >बाजारहाट > Dal Market Price : महिनाभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात 4 टक्के घट, जाणून घ्या सविस्तर 

Dal Market Price : महिनाभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात 4 टक्के घट, जाणून घ्या सविस्तर 

Latest News 4 percent reduction in price of gram, tur and ud dal know in detail  | Dal Market Price : महिनाभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात 4 टक्के घट, जाणून घ्या सविस्तर 

Dal Market Price : महिनाभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात 4 टक्के घट, जाणून घ्या सविस्तर 

Dal Market : देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या महिन्याभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात जवळजवळ 4 टक्के घट झाली

Dal Market : देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या महिन्याभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात जवळजवळ 4 टक्के घट झाली

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या महिन्याभरात चणा, तूर (tur) आणि उडीद डाळीच्या दरात जवळजवळ 4 टक्के घट झाली, मात्र किरकोळ विक्रीच्या दरात (Dal Market Price) अशी घट दिसून आली नाही, अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी दिली. त्याचबरोबर घाऊक बाजार आणि किरकोळ दरामधील तफावत त्यांनी निदर्शनास आणून देत किरकोळ व्यापारी अधिक नफा कमवत असल्याचे सूचित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आज नवी दिल्ली (New Delhi) येथे ग्राहक व्यवहार विभागाने रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय), अर्थात भारतीय किरकोळ व्यापारी संघटनेची बैठक आयोजित केली होती. डाळींच्या किमती आणि 21.06.2024 आणि 11.07.2024 च्या  विशिष्ट अन्न पदार्थांच्या वाहतुकीवरील निर्बंध (पहिली आणि दुसरी दुरुस्ती) आदेश 2024 अनुसार,  साठवणीवरील मर्यादा यासह  इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी बोलताना निधी खरे म्हणाल्या कि, भारतीय किरकोळ व्यापारी संघटनेचे (आरएआय) 2300 हून अधिक सदस्य असून, देशभरात संघटनेची 6 लाखापेक्षा जास्त विक्री केंद्र आहेत. तसेच यंदा खरिपामधील डाळींची पेरणी समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख खरीप डाळ उत्पादक राज्यांमध्ये तूर आणि उडीद डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार विशेष  प्रयत्न करत असून, नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांचे वितरण केले जात आहे आणि आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी कृषी विभाग राज्याच्या कृषी विभागांशी सतत संपर्कात आहे असे त्या म्हणाल्या. 

योग्य दराने डाळींची विक्री

डाळींच्या दराची सध्याची स्थिती आणि खरीप पिकाची स्थिती लक्षात घेता, डाळींचे दर ग्राहकांना परवडण्याजोगे ठेवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना किरकोळ उद्योगाने हातभार लावावा, असे त्या म्हणाल्या. विहित मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या साखळी विक्रेत्यांसह सर्व साठवणी संस्थांकडील डाळींच्या साठ्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापार्‍यांकडून होणारे साठवणी मर्यादेचे उल्लंघन, सट्टेबाजी आणि नफेखोरी विरोधात सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला. किरकोळ उद्योगातील सहभागींनी आश्वासन दिले की, ते आपल्या किरकोळ नफ्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करतील आणि ग्राहकांना किफायतशीर ठरेल, अशा योग्य दराने डाळींची विक्री करतील.

Web Title: Latest News 4 percent reduction in price of gram, tur and ud dal know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.