Lokmat Agro >बाजारहाट > Onion Production : उन्हाळ कांदा उत्पादनात 40 टक्के घट, अपेक्षित दराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 

Onion Production : उन्हाळ कांदा उत्पादनात 40 टक्के घट, अपेक्षित दराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 

Latest news 40 percent decline in summer onion production market price down | Onion Production : उन्हाळ कांदा उत्पादनात 40 टक्के घट, अपेक्षित दराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 

Onion Production : उन्हाळ कांदा उत्पादनात 40 टक्के घट, अपेक्षित दराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीस वेग आला असून, बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीस वेग आला असून, बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीस वेग आला असून, बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. मागच्या १५ दिवसात तीन लाख टन कांद्याची आवक झाली. नाशिक बाजार समितीत १५ दिवसांपासून कांदा विक्री सुरू झाली. त्यात सुटीचे तीन दिवस वगळता जवळपास २५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी कांदा लागवड क्षेत्रात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. काही दिवसांपासून कांदा दरात घसरण झाली होती, आता कुठे समाधानकारक भाव मिळत आहे. मात्र लागवडीचा एकूण खर्च पाहता अजून भाववाढ होणे अपेक्षित आहे. उन्हाळी कांद्याची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होते आणि काढणी मार्चमध्ये सुरू होते. आता उन्हाळी कांदा लागवड संपली आहे. गेल्या वर्षी उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हाात उन्हाळी कांदा लागवडीचे क्षेत्र २.५० लाख हेक्टर होते, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातील २.२१ लाख हेक्टर होते आणि उत्पादन ५३ लाख टन होते. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव पसिरात तापमानाचा पारा ३५ ते ४० च्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात सध्या उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. मागील वर्षी पावसाची तूट असल्याने दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून, तापलेली जमीन व त्यातून निघणाऱ्या तप्त झळा यामुळे शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. काढणीस आलेले कांदा पीक उन्हाच्या चटक्याने करपू नये, म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्या पाचटाचा वापर करताना दिसत आहेत. काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. उन्हाच्या घटक्याने शेतातील पिकेही पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत.

दोन दिवसांनंतर २१८६ क्विंटल आवक

सनिवारी व रविवारी दोन दिवस नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसा सुटी असल्याने सोमवारी कांद्याची चागली आवक झाली. एका दिवसात २२८६ क्विंटल कांदा आला. कमीत कमी 800 तर साधारण 1400 चा भाव मिळाला. 

 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: Latest news 40 percent decline in summer onion production market price down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.