Agriculture News :नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) लासलगाव कांदा मार्केट आज बंद राहणार आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप आज मंगळवार नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांदा लिलाव बंद राहणार आहेत. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू राहणार आहेत.
मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Arakshan) मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवार (दि. १३) नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील (manoj Jarange) यांच्या उपस्थितीत होत आहे. सकाळी ११ वाजता तपोवन येथून रॅलीला प्रारंभ होणार असून सीबीएस चौकात संबोधित केल्यानंतर रॅलीची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की, निफाड पुर्व सकल मराठा समाज समिती यांचेकडील दि. ०८ ऑगस्ट, २०२४ रोजीचे पत्रानुसार मंगळवार, दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा, भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन शांततामय मागनि व्हावे, यासाठी काढण्यात आलेली शांतता रैली आज (दि.१३) नाशिकमध्ये दाखल होणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून समाजबांधव रस्त्यावर उतरणार असून आज रैलीची सांगता होईल. रॅलीला होणारी गर्दी पाहता शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा, भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.