Join us

Tur dal Rate : तूर आणि उडीद डाळीच्या दरात जवळजवळ 10 टक्के घट, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 4:06 PM

Agriculture News : खरीप हंगामात डाळींचे पेरणी क्षेत्र आणि उपलब्धतेत वाढ झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांत बहुतांश डाळींच्या बाजार भावाचा कल घटता राहिल्याचे दिसून येत आहे.

Agriculture News : खरीप हंगामात (Kharif Seaosn) डाळींचे पेरणी क्षेत्र आणि उपलब्धतेत वाढ झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांत बहुतांश डाळींच्या बाजार भावाचा कल घटता राहिल्याचे दिसून येत आहे. आजच्या बाजार अहवालानुसार तूर डाळीला (Tur Dal) क्विंटलमागे १५ हजार रुपये तर उडीद डाळीला १२ हजार ८५० रुपये दर मिळतो आहे. तर ग्राहक व्यवसाहर विभागाच्या माहितीनुसार मागील तीन महिन्यात बाजारभावात दहा टक्के घट झाली आहे. 

ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज भारतीय किरकोळ व्यापारी संघटना (RAI) आणि प्रमुख संघटित किरकोळ व्यापार संघटनांची बैठक घेतली. यात प्रमुख डाळींच्या दराची स्थिती आणि कल यावर चर्चा केली. ग्राहक व्यवहार सचिवांनी माहिती दिली की, देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तूर आणि उडीद डाळीचे दर गेल्या तीन महिन्यांत सरासरी १० टक्के कमी झाले आहेत, पण किरकोळ दरात अशी घसरण दिसून आली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात 7 टक्के अधिक क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली असून, पिकाची स्थिती देखील उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच चणा डाळीच्या संदर्भात, गेल्या एक महिन्यात मोठ्या बाजारांमध्ये भावात सरासरी घट झाली, पण किरकोळ दर वाढत आहेत. डाळींच्या किरकोळ आणि घाऊक भावातील तफावत म्हणजे, किरकोळ विक्रेते बाजार भावातील चढ-उतारांचा गैरफायदा घेऊन अधिक नफा कमवत असल्याचे दर्शवत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाजारातील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, ही तफावत अधिक वाढताना आढळून आली, तर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे त्या म्हणाल्या.

देशात डाळींची पुरेशी उपलब्धता

डाळींच्या उपलब्धतेवर बोलताना ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी माहिती दिली की, खरीपातील उडीद आणि मूग डाळ  बाजारात येऊ लागली आहे, तर देशांतर्गत उत्पादनाला पूरक म्हणून, पूर्व आफ्रिकी देश आणि म्यानमार मधून तूर आणि उडीद डाळीची आयात होत आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या साठा जाहीर करण्याच्या पोर्टलवर मोठ्या साखळी विक्रेत्यांद्वारे जाहीर करण्यात आलेल्या डाळींच्या साठ्याचे प्रमाण दर आठवड्याला वाढत आहे. यावरून देशातील डाळींची पुरेशी उपलब्धता स्पष्ट होत आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रतुराशेतकरीमार्केट यार्ड