Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याची आवक घटली, आजचा कांदा बाजारभाव जाणून घ्या? 

कांद्याची आवक घटली, आजचा कांदा बाजारभाव जाणून घ्या? 

Latest News arrival of onion decreased, know today's onion market price? | कांद्याची आवक घटली, आजचा कांदा बाजारभाव जाणून घ्या? 

कांद्याची आवक घटली, आजचा कांदा बाजारभाव जाणून घ्या? 

दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच असून आजही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिसून येत नाही.

दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच असून आजही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिसून येत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच असून आजही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिसून येत नाही. आज २५ डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 1600 रुपये इतका दर मिळाला. तर पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1400 इतका दर मिळाला. म्हणजेच कालच्या बाजारभावापेक्षा आज लाल कांद्याचा बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयांनी पुन्हा घसरल्याचे दिसून आले. 

एकीकडे शासनाची कांदा निर्यात बंदी, दुसरीकडे अवकाळी पावसांनंतरची स्थितीत यामध्ये शेतकरी आर्थिक शेतकरी कोंडीत सापडला आहे. सातत्याने बाजारभावात घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये 5984 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर तर पिंपळगंगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची केवळ 100 क्विंटल इतकी आवक झाली. मागील काही दिवसांत सातत्याने कांद्याची आवक घटत चालली आहे. दुसरीकडे भावात घसरण होत असल्याने आवक कमी होत चालली असून शेतकरी भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/12/2023
कोल्हापूर---क्विंटल500550035001800
लासलगावलालक्विंटल598470017721600
लासलगाव - विंचूरलालक्विंटल850075017801650
मनमाडलालक्विंटल400030017741500
लोणंदलालक्विंटल235050020501500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल456070025001600
पुणेलोकलक्विंटल1150670025001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल6160022001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7130020001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल49130017001000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1299565020661600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल100100015251400

 

Web Title: Latest News arrival of onion decreased, know today's onion market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.