नाशिक : आज अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे सर्वच लिलाव बंद होते. नाशिक जिल्ह्यातील विंचूर आणि निफाड या बाजार दुपारपर्यंत सुरु होत्या. विंचूर बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
आज देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून उत्तरप्रदेशातील अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पार्श्वभूमीवर आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांश बाजार समित्या देखील बंद होत्या. यात नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या लासलगाव, येवला, पिंपळगाव बसवंत आदी कांदा बाजार समित्या देखील बंद होत्या. फक्त निफाड आणि विंचूर या दोन बाजार समित्यांमध्ये दुपारपर्यंत लिलाव सुरु होते. त्यानंतर या दोन्हीही बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार विंचूर बाजार समितीत आज 7 हजार 380 क्विंटल कांद्याची आवक झाली. तर कमीत कमी प्रति क्विंटल 400 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 1300 रुपये भाव मिळाला. पुणे बाजार समितीत 11 हजार 435 इतकी लोकल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 500 तर सरासरी 1100 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे-मोशी बाजार समितीमध्ये 435 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात कमीत कमी 400 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 800 रुपये भाव मिळाला. वाई बाजार समितीमध्ये 100 क्विंटल कांदा आवक झाली. यानुसार कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
असे आहेत आज राज्यातील कांदा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/01/2024 | ||||||
लासलगाव - विंचूर | लाल | क्विंटल | 7380 | 400 | 1400 | 1300 |
पुणे | लोकल | क्विंटल | 11435 | 500 | 1700 | 1100 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 435 | 400 | 1200 | 800 |
वाई | लोकल | क्विंटल | 100 | 500 | 1500 | 1000 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 608 | 200 | 2000 | 1500 |