Join us

Banana Market : पुणे, जळगाव बाजारात केळीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 6:04 PM

Banana Market : आजच्या बाजारभाव अहवालानुसार केळीला कुठे काय बाजारभाव मिळाला? हे पाहुयात..

जळगाव : जळगावच्या (Jalgaon) बऱ्हाणपूर बाजारा दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल ३ हजार ५६ रुपयांचा भाव मिळाला. केळी मालाचा तुटवडा असताना बन्हाणपूर केळी बाजारात १९८ पैकी १४८ ट्रकमधील केळीचा लिलाव झाला. आजच्या बाजारभाव अहवालानुसार सर्वाधिक बाजारभाव हा यावल बाजारात मिळाला आहे. क्विंटलमागे २११० रुपयांचा दर मिळाला. 

जम्मू व लडाखसह उत्तर भारतात केळीची (Banana Market) मागणी असताना केळी मालाची उपलब्धता नाही. यंदाच्या हंगामात काही भागातील केळी उत्पादकांना फटका बसल्याने आवक देखील कमी असल्याचे चित्र आहे. तर आता बन्हाणपूर व जामनेरची केळी तेजीत आहेत. ऑगस्टच्या उत्तरार्धापासून दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल अडीच हजार ते २ हजार ९०० रुपयांपर्यंत दरात चढ-उतार सुरू होता.बऱ्हाणपूर बाजारातील १९८ पैकी लिलाव झालेल्या १४८ ट्रकमधील दर्जेदार केळीचा ३ हजार ५६ रुपये प्रतिक्विंटल दराने लिलाव झाला. किमान लिलाव १ हजार ९९५ रुपये दराने झाला आहे. 

दरम्यान आजच्या बाजारभाव अहवालानुसार पुणे बाजारात लोकल केळीला 1200 रुपये तर पुणे मोशी बाजारात सर्वाधिक 05 हजार रुपये दर मिळाला. तसेच नागपूर बाजारात केवळ 525 रुपये आणि यावल बाजारात नंबर एक केळीला 2110 रुपये दर मिळाला. बाजारात आवक कमी असल्याने काही ठिकाणी बाजारभाव समाधानकारक मिळत असल्याचे चित्र आहे. 

केळीची उपलब्धता नाही..... 

केळी निर्यातदार विशाल अग्रवाल म्हणाले कि, एकीकडे केळीची उपलब्धता नाही, तर दुसरीकडे बाजारपेठेत मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत उत्तर प्रदेशातून केळी येण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात, आंध्र प्रदेशातही केळीची वानवा असल्याने केळी भावांमध्ये तेजी आली आहे. शेतकरी राजू पाटील म्हणाले की,  सध्या दर्जेदार केळीला ३,१०० ते ३,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव सुरू आहे. मालाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे. रावेरकडील केळीमाल संपल्याने जामनेर व चोपड्याकडील केळीस भाव आला आहे. हा भाव दिवाळीपर्यंत कायम राहील. 

टॅग्स :केळीशेती क्षेत्रजळगावमार्केट यार्ड