Lokmat Agro >बाजारहाट > Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Banana market price for per kilo on shravani somwar see details | Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Banana Market : बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे.

Banana Market : बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव :केळी उत्पादक (Banana Market) शेतकऱ्यांना अनेक महिन्यांनंतर 'अच्छे दिन' आले आहेत. केळीच्या दरात प्रतिक्विंटल वाढ झाली असून, १५०० ते २४०० रुपयांपर्यंत केळीचे दर पोहोचले आहेत. बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे. आज केळीला पुणे बाजारात सरासरी 1100 रुपये दर मिळाला आहे. तर यावल बाजारात नंबर एकच्या केळीला 1810 मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात(Jalgaon District ) सद्यःस्थितीत केळीच्या कांदेबागाची आवक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची केळी काही महिन्यांपूर्वी काढली गेली आहे. तर काहींची केळी अजून निसाळलेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून केळीची आवक होत आहे, अशांना चांगला दर मिळत आहे. सर्वसाधारण केळीला १५०० रुपयांचा दर मिळत आहे. तर चांगल्या मालाला २ हजार रुपयांचा दर मिळत आहे. निर्यात होणाऱ्या मालाला २५०० रुपयांपर्यंतचाही दर मिळत आहे.


एप्रिलमध्ये ६०० रुपयांपर्यंत घसरले होते दर
एप्रिल महिन्यात मृग बागांची आवक वाढली होती. मात्र, तेव्हाच केळीचे दर ६०० ते ४०० रुपयांपर्यंत खाली आले होते. रावेर, चोपडा या तालुक्यांमध्ये मृग बागांची लागवड सर्वाधिक होती. मात्र, तेव्हा केळीची आवक वाढत असताना मोठ्या प्रमाणात भाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते.

महिनाभर तरी भाव राहणार स्थिर
केळी मार्केटचे अभ्यासक व केळी उत्पादक असलेले डॉ. सत्त्वशील जाधव यांनी सांगितले की, सध्या श्रावण महिना सुरू आहे. आंब्याचा हंगाम संपला आहे. तर दुसरीकडे इतर फळांच्या दराच्या तुलनेत केळी स्वस्त मिळते. यामुळे केळीला मागणी वाढली असून, त्यामुळेच केळीचे दर वाढले आहेत. यासह निर्यात देखील वाढली आहे. श्रावण महिनाभर तरी केळीचे दर स्थिर राहतील अशी परिस्थिती आहे.

आताचे केळी बाजारभाव

आज केळीला पुणे बाजारात सरासरी 1100 रुपये दर मिळाला आहे. तर यावल बाजारात नंबर एकच्या केळीला 1810 मिळाला आहे. तर कालचा बाजारभाव पाहिला असता अहमदनगर बाजारात सर्वसाधारण केळीला क्विंटलमागे 1500 रुपये, नाशिक बाजारात भुसावळ केळीला 1500 रुपये, पुणे बाजारात लोकल केळीला 1100 रुपये, तर पुणे मोशी बाजारात लोकल केळीला सर्वाधिक 04 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. 

Web Title: Latest News Banana market price for per kilo on shravani somwar see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.