नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमना न्यू धान्य बाजारात डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार ५५ ते ६० रुपये असलेले चिन्नोरचे दर सध्या ७२ ते ७६ रुपयांवर पोहोचले. तर जयश्रीराम तांदूळ प्रति किलो ६ रुपयांनी वाढून ५८ ते ६२ रुपयांवर गेला आहे. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे.
नागपुरात ३५ टक्के चिन्नोर, ५० टक्के जयश्रीराम, बीपीटी, सुवर्णा आणि १० टक्के आंबेमोहोर व जयप्रकाश तांदळाची विक्री होते. त्यातच काली मूंछ वाणाचा तांदूळ खरेदी करणारेही बरेच आहेत. पण, सर्वाधिक पसंती जुन्या चिन्नोरला आहे. या तांदळाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल १,८०० रुपयांनी वाढले आहेत. आंबेमोहर ६० ते ६४ रुपये आणि जयप्रकाश तांदूळ ८० ते ८२ रुपयांवर पोहोचला आहे. श्रीमंतांचा समजला जाणाऱ्या बासमती तांदळाचे दर दर्जानुसार प्रति किलो ७० ते १२० रुपयांदरम्यान आहे.
दरवाढीची शक्यता
यावर्षी मार्चमध्येच ऊन वाढल्यामुळे तांदळातील ओलावा कमी झाला. त्यामुळे तांदळाचे दर वाढले असून जुन्या तांदळालाही मागणी आहे. सामान्य आणि उच्च मध्यमवर्गीयांकडून जयश्रीराम, चिन्नोर, आंबेमोहोर, जयप्रकाश आणि गरिबांकडून बीपीटी आणि सुवर्णा तांदळाला मागणी आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात भाव वाढले आहेत.
- रमेश उमाठे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.
तांदळाचे प्रकार व किंमत (घाऊक) प्रतिकिलो भाव
चिन्नोर ७३-७६ रुपये, जय श्रीराम ५८-६२ रुपये, आंबेमोहोर ६०-६४ रुपये, जयप्रकाश ८०-८२ रुपये, बीपीटी ४२-४४ रुपये, सुवर्णा ३२-३५ रुपये, बासमती ७०-१२० रुपये असा दर मिळतो आहे.
आजचे बाजार समित्यांमधील बाजारभाव
पुणे बासमती तांदळाला सर्वाधिक 09 हजार 500 पन्नास रुपये असा दर मिळाला. नागपूर बाजार समिती चिन्नोर तांदळाला 5900 रुपये, पुणे बाजार समितीत कोलम तांदळाला 5750 रुपये तर अलिबाग बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत लुचाई तांदळाला 03 हजार 150 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत मसुरा तांदळाला 3995 तर पुणे बाजार समितीत 03 हजार 150 रुपये असा दर मिळाला . नागपूर बाजार समिती परमल तांदळाला 3725 रुपये असा दर मिळाला.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
14/05/2024 | ||||||
पालघर (बेवूर) | --- | क्विंटल | 260 | 4300 | 4300 | 4300 |
पुणे | बसमती | क्विंटल | 43 | 6400 | 12700 | 9550 |
नागपूर | चिनोर | क्विंटल | 100 | 5600 | 6000 | 5900 |
पुणे | कोलम | क्विंटल | 648 | 4600 | 6900 | 5750 |
अलिबाग | कोलम | क्विंटल | 10 | 1000 | 1500 | 1200 |
मुरुड | कोलम | क्विंटल | 10 | 1000 | 1500 | 1200 |
नागपूर | लुचाई | क्विंटल | 60 | 3000 | 3200 | 3150 |
सोलापूर | मसुरा | क्विंटल | 1302 | 3260 | 6540 | 3995 |
पुणे | मसुरा | क्विंटल | 401 | 3000 | 3300 | 3150 |
मानगाव (भादव) | नं. २ | क्विंटल | 173 | 1900 | 4000 | 3500 |
कर्जत (रायगड) | नं. २ | क्विंटल | 21 | 4000 | 5800 | 4800 |
नागपूर | परमल | क्विंटल | 50 | 3500 | 3800 | 3725 |