जळगाव : चाळीसगाव पावसाची (Rain) सातत्याने हुलकावणी सुरू असतानाच चाळीसगाव बाजार समितीत यंदाच्या खरीप हंगामातील (Kharip Season) मुगाची आवक होत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी आवक झालेल्या मुगाला ९ हजार ११ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. व्यापारी हेमंत वाणी यांनी पूजन करून मूग खरेदी केला. गणेशपूर येथील शेतकरी सोनू सूर्यवंशी यांनी मुगाचे उत्पन्न घेतले आहे.
चाळीसगाव तालुक्यात (Chalisgaon) गतवर्षी गंभीर दुष्काळ ठाण मांडून होता. यंदाही पावसाची ओढ सुरूच असून वाढीवर असणाऱ्या पिकांना फक्त बुस्टर मिळत आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाळ्याच्या मध्यावर उडीद व मुगाचे उत्पन्न हाती येते. पावसाचे बिघडलेले वेळापत्रक पाहता उडीद, मुगाची फारशी लागवड झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम थांबली असून ऊन वाढले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील ५ ऑगस्ट रोजी मुगाची पहिली आवक झाली. त्यामुळेच ६००० ते ९०११ असे लिलाव पुकारले गेले.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक भाव
सद्यःस्थितीत शेतीची कामे सुरू असून अत्यल्प पाऊस असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तालुक्यातील १३ मध्यम प्रकल्प कोरडेठाक असून मन्याड मध्येही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदा खरिपाच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त आहे. बाजार समितीत शेतमालाची आवक कमी आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील पहिल्या मुगाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता अडत व्यापारी यांनी गुलालाने मुगाचे पूजन केले. ९०११ रुपये प्रतिक्चिटलने मुगाची खरेदी केली. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक भाव मिळाला आहे.
आज काय बाजारभाव मिळाला?
आज कारंजा बाजार समितीत सर्वसाधारण मुगाला 7 हजार 160 रुपये तर वाशिम बाजार समितीत चमकी मुगाला 7250 रुपये, तर पुणे बाजारात हिरव्या मुगाला 09 हजार 900 रुपये, चोपडा बाजारात 7 हजार 200 हिंगोली बाजार 07 हजार 200 रुपये, सांगली बाजारात लोकल मुगाला 09 हजार आठशे रुपये दर मिळाला. तसेच अमरावती बाजारात मोगली मुगाला 7 हजार 175 रुपये असा सरासरी भाव मिळाला.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/08/2024 | ||||||
कारंजा | --- | क्विंटल | 10 | 7000 | 7350 | 7160 |
वाशीम | चमकी | क्विंटल | 15 | 7050 | 7511 | 7250 |
पुणे | हिरवा | क्विंटल | 38 | 9200 | 10600 | 9900 |
चोपडा | हिरवा | क्विंटल | 2 | 7200 | 7400 | 7200 |
हिंगोली | हिरवा | क्विंटल | 3 | 6900 | 7500 | 7200 |
बुलढाणा | हिरवा | क्विंटल | 18300 | 1 | 1 | 1 |
सांगली | लोकल | क्विंटल | 100 | 8700 | 10900 | 9800 |
अमरावती | मोगली | क्विंटल | 3 | 7000 | 7350 | 7175 |