Join us

Todays Onion Bajarbhav : लोकसभा निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 5:47 PM

Todays Onion Rate : लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Onion Market : आज देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला. यात अनेक जागांवर भाजपला (BJP) सपशेल पराभव स्वीकारावा लागला. यात महाराष्ट्रातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघाचा समावेश आहे. याच मतदारसंघात कांदा हे पीक घेतलं जातं आणि गेल्या अनेक दिवसांपासून कांदा (onion Issue) प्रश्न तिढत आहे. पाहुयात आज कांद्याला काय भाव मिळाला.

आज चार जून 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 97 हजार क्विंटलची आवक झाली. यात कांद्याला सरासरी 1400 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1500 रुपयांपासून ते 2250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सर्वाधिक दर हा सातारा बाजार समितीत मिळाला.

त्यानंतर आज लाल कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यात सोलापूर बाजार समिती 1600 रुपये, धुळे बाजार समितीत 1810 रुपये, साक्री बाजार समितीत 1850 रुपये तर हिंगणा बाजार समिती 02 हजार रुपयांचा दर मिळाला. तर आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये पासून ते 2100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात येवला अंदरसुल बाजार समिती 1700 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीत 2150 रुपये, सिन्नर बाजार समिती 2050 रुपये, मनमाड बाजार समिती 1750 रुपये, सटाणा बाजार समितीत 1950 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत आजचे सविस्तर बाजार भाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/06/2024
कोल्हापूर---क्विंटल340670028001700
अकोला---क्विंटल47070020001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल141370022001450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6718170026002150
खेड-चाकण---क्विंटल250150025002000
सातारा---क्विंटल216200025002250
राहता---क्विंटल360840027001900
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4925100028001400
कराडहालवाक्विंटल99100020002000
सोलापूरलालक्विंटल754410031001600
धुळेलालक्विंटल63850020201810
साक्रीलालक्विंटल6550105023001850
हिंगणालालक्विंटल1200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल42060018001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल177170027001700
पुणेलोकलक्विंटल641070025001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3150025002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल61580020001400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700180021001900
जामखेडलोकलक्विंटल57820021001150
इस्लामपूरलोकलक्विंटल175190025002200
कामठीलोकलक्विंटल15100020001500
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल60040020401700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल8100100024522150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000075022711800
सिन्नरउन्हाळीक्विंटल41050022602050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल41350022612100
संगमनेरउन्हाळीक्विंटल278720026001400
मनमाडउन्हाळीक्विंटल50060021221750
सटाणाउन्हाळीक्विंटल1058055522801950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल900060024612051
रामटेकउन्हाळीक्विंटल24140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल350085022201980
टॅग्स :कांदालोकसभा निवडणूक २०२४ निकालशेतीनाशिक