Lokmat Agro >बाजारहाट > Microsoft Outage : जेएनपीटीवर कंटेनर अडकले, सर्व्हर डाऊनचा कांदा बाजारभावावर परिणाम? 

Microsoft Outage : जेएनपीटीवर कंटेनर अडकले, सर्व्हर डाऊनचा कांदा बाजारभावावर परिणाम? 

latest News Container stuck on JNPT Microsoft Outage server down effect on onion market price | Microsoft Outage : जेएनपीटीवर कंटेनर अडकले, सर्व्हर डाऊनचा कांदा बाजारभावावर परिणाम? 

Microsoft Outage : जेएनपीटीवर कंटेनर अडकले, सर्व्हर डाऊनचा कांदा बाजारभावावर परिणाम? 

Kanda Market : सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी बंदरावर शेतमालाचे कंटेनर अडकले असून त्याचा परिणाम थेट कांदा बाजारभावावर दिसू लागला आहे.

Kanda Market : सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी बंदरावर शेतमालाचे कंटेनर अडकले असून त्याचा परिणाम थेट कांदा बाजारभावावर दिसू लागला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन (Microsoft Outage)  झाल्यामुळे देशभरात अनेक कंपन्यांना, बँकांना फटका बसला. त्याचबरोबर शेतीमालाच्या मार्केटवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी बंदरावर शेतमालाचे कंटेनर अडकले असून त्याचा परिणाम थेट कांदा बाजारभावावर (Onion Market) दिसू लागला आहे.

19 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टची (Microsoft Outage) सेवा अचानक विस्कळीत झाली. आणि जगभरातील ऑनलाइन यंत्रणा काही काळासाठी ठप्प झाली. याचा परिणाम बँकांसह कंपन्या, विमानसेवा इतर खाजगी कंपन्यांना देखील बसला. त्याचबरोबर शेतमालाची वाहतूक करणाऱ्या कंटेनर्सला देखील त्याची झळ सोसावी लागली. सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी वरील कंटेनर आणि निर्यात होणाऱ्या भाजीपालावरील व इतर वस्तूंचे ऑनलाईन नोंदणी रखडली. नोंदणीसाठी लागणारा अर्धा तासाचा वेळ जवळपास दहा ते बारा तासांवर येऊन ठेपला जवळपास साडेसात हजारहून अधिक कंटेनर हे उभे राहिले आहेत. कंटेनरची नोंदणी उशिरा होत असल्याने परदेशात माल पाठवण्याचा कालावधी देखील वाढला आहे आणि याचा परिणाम थेट बाजार भाव देखील होऊ लागला आहे.

दरम्यान कांदा बाजार भाव काहीचे घसरले असल्याचे चित्र आहे. आज सकाळ सत्रात लासलगावसह लासलगाव विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 2750 रुपये, पिंपळगाव बाजार समितीत 2700 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या उपबाजार असलेल्या सायखेडा बाजारात देखील 2700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर दिंडोरी बाजार समिती 2600 रुपये तर दिंडोरी-वणी बाजारात 2800 रुपयांचा दर मिळाला आहे.

सर्व्हर डाऊनमुळे शेतमालाचे कंटेनर अडकून पडले आहेत. नोंदणीला विलंब लागत असल्याने निर्यातीचा कालावधी देखील वाढला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट बाजारभावावर दिसू लागला आहे. एकीकडे कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यातशुल्क (export duty) आणि 550 डॉलरचे किमान निर्यात मूल्य (minimum export price ) यामुळे अत्यल्प होणारी कांदा निर्यात व त्यात आता निर्यातदारांचे पोर्टवर कंटेनर अडकून पडल्याने अधिक अडचणींची भर पडून कांदा दरात घरसण सुरू आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील सर्व शुल्क हटवणे, हाच महत्वाचा मुद्दा आहे. 

- भारत दिघोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना 

 

Web Title: latest News Container stuck on JNPT Microsoft Outage server down effect on onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.