Join us

Cotton Market : कापूस आवकेत कमालीची घसरण, मागील आठवडाभर काय दर मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:47 PM

Cotton Market : भारतातील कापसाच्या साप्ताहिक आवकेत मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Cotton Market : मागील आठवड्यातील कापसाचे बाजार भाव (Cotton Market yard) पाहिले असता राजकोट बाजार समितीत प्रतिक्विंटल 07 हजार 670 रुपये, नागपूर बाजारात 7 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल, वर्धा बाजारात 7 हजार 600 रुपये, प्रति क्विंटल यवतमाळ बाजारात 7580 रुपये प्रतिक्विंटल तर अकोला बाजारात 7 हजार 558 प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. एकूणच कापसाच्या बाजारभाव स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात. 

आवकेत झालेली घसरण 

भारतातील कापसाच्या साप्ताहिक आवकेत (Cotton Market) मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात 20 हजार टनापर्यंत होती. त्यात हळू घसरण होऊन मे महिन्यात 10 ते 15 हजार टनापर्यंत आवक येऊन पोहोचली होती. त्यानंतर जूनमध्ये यात कमालीची घसरण होऊन हा आकडा 05 हजार ते 10 हजार टनापर्यंत येऊन पोहोचला होता. त्यानंतर सद्यस्थितीत 0 ते 05 हजार टन इतकी कापसाची आवक होत आहे.

जागतिक कापूस दर कमी

1 ऑगस्टपासून सुरु झालेल्या 2024-25 च्या हंगामात अमेरिकेत ब्राझील आणि तुर्कीसह पीक जास्त असेल या अपेक्षेने जागतिक कापूस दर कमी झाले आहेत. किमान आधारभूत किंमतीत कापूस खरेदी करण्यासाठी सी. सी. आय. ही सरकारची नोडल एजन्सी आहे (MSP). जेव्हा किंमती एम. एस. पी. पातळीच्या खाली येतात तेव्हा ती खरेदी करते. कापसाचा हंगाम ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 पर्यंत चालतो.

उपाययोजना आवश्यक 

वाढता खप आणि निर्यातीमध्ये विक्रमी कमी साठा असलेल्या भारताच्या कापूस क्षेत्राला गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. उत्पादन अंदाजांमधील विसंगती आधीच आव्हानात्मक आहे, जागतिक बाजारपेठेत पुरवठा स्थिरता आणि स्पर्धात्मकता सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता आहे. अनिश्चितता कायम राहिल्याने, जोखीम कमी करण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या बाजारपेठेच्या गतिशीलतेच्या पार्श्वभूमीवर उ‌द्योगाची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय उपाय आवश्यक आहेत.

अलीकडील कापूस बाजारभाव 

आठ ऑगस्ट रोजी जळगाव बाजारात मध्यम स्टेपलच्या कापसाला प्रतिक्विंटल 06 हजार 560 रुपये दर मिळाला. 10 ऑगस्ट रोजी अमरावती बाजारात मध्यम स्टेपलच्या कापसाला प्रतिक्विंटल 07 हजार 300 रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात 12 ऑगस्ट रोजी एच फोर मध्यम स्टेपलच्या कापसाला 07 हजार 150 रुपये दर मिळाला. तर आज जळगाव बाजारात मध्यम स्टेपलच्या कापसाला 06 हजार 680 रुपये दर मिळाला.

टॅग्स :कापूसकॉटन मार्केटशेती क्षेत्रमार्केट यार्डमहाराष्ट्र