Join us

Cotton Market : वर्ध्यात कापूस खरेदीचा शुभारंभ, तळेगाव येथे कापसाला 'इतके' रुपये भाव, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 9:35 PM

वर्धा : स्थानिक एम. आर. जिनिंग प्रेसिग फॅक्टरीमध्ये  कापूस खरेदीचा (Cotton Market) शुभारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला प्रतिक्विंटल ७ ...

वर्धा : स्थानिक एम. आर. जिनिंग प्रेसिग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदीचा (Cotton Market) शुभारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार १६१ रुपये भाव देण्यात आला. प्रथम काटापूजन करून खरेदीला प्रारंभ करण्यात आला. मुहूर्तावर ६६१ क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापूस विक्रीकरिता आणणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना राठी परिवारातर्फे स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी तळेगावातील नागरिक, बाजार समिती, जिनिंग प्रेसिंगचे कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील कापूस पट्ट्यात वेचणीची लगबग सुरू असून मात्र कापसाची आवक (Kapus Bajarbhav) काही वाढत नसल्याचे चित्र आहे तसेच कापसाचे बाजार भाव देखील एमएसपी पेक्षा कमी आहेत. केंद्र सरकारने 2023 24 मध्ये कापसाला 07 हजार 20 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला तर यंदा म्हणजेच 2024-25 साठी त्यात वाढ करून तो 7 हजार 521 रुपये करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे बाजार भाव मात्र एमएसपी पेक्षा कमी आहेत. आजचे बाजार भाव पाहिले (Cotton Bajarbhav) असता चंद्रपूर बाजारात 210 क्विंटलची आवक झाली यात कमीत कमी 07 हजार रुपये तर सरासरी 06 हजार 75 रुपये दर मिळाला. तर लोकल कापसाची 16 क्विंटल होऊन कमीत कमी 06 हजार 500 रुपये तर सरासरी 7000 रुपये दर मिळाला. 

नागपूर बाजारात सर्वसाधारण कापसाची 150 क्विंटलची आवक झाली. तर कमीत कमी 07 हजार रुपये आणि सरासरी देखील 07 हजार रुपयांचा दर मिळाला. तर लोकल कापसाला कमीत कमी 06 हजार 700 रुपये तर सरासरी 6 हजार 950 रुपये दर मिळाला आणि एकूण 474 क्विंटल कापसाचे आवक झाली.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/10/2024
चंद्रपुर---क्विंटल210700071517075
चंद्रपुरलोकलक्विंटल16650071017000
नागपूर---क्विंटल150700070007000
नागपूरलोकलक्विंटल98670071506950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)474

 

टॅग्स :कापूसकॉटन मार्केटशेती क्षेत्रमार्केट यार्ड