Cotton Market : गेल्या काही दिवसांपासून कापसाचे बाजारभाव (Cotton Market) उतरतेच आहेत. कमीत कमी 6 हजार 500 रुपयापासून 7 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. जर कापसाचे एमएसपीचा (Cotton MSP) विचार केला, तर मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 121 रुपये तर लांब स्टेपल कापसाला 07 हजार 521 रुपये असा हमीभाव ठरवण्यात आला आहे. मात्र या दोन्हीही कापसाला अपेक्षित मिळत नसल्यचे चित्र आहे.
मागील सात दिवसांचा वर्धा, सिंदी सेलू आणि आकोट बाजार समितीतील बाजारभावाचा (Kapus Bajarbhav) विचार केला तर 11 नोव्हेंबर रोजी वर्धा बाजारात मध्यम स्टेपल कापसाला 7170 रुपये तर लांब स्टेपल कापसाला सिंधी सेलू बाजारात 7200 रुपये तर अकोट बाजारात एच 4 मध्यम स्टेपल कापसाला 7 हजार 800 रुपये दर मिळाला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी वर्धा बाजारात मध्यम स्टेपलला 7150 रुपये, सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपल ला 07 हजार 200 रुपये दर मिळाला. 14 नोव्हेंबरचा विचार केला तर वर्धा बाजारात मध्यम स्टेपला 06 हजार 450 रुपये, आर्वी बाजारात एच 04 मध्यम स्टेपला 07 हजार 200 रुपये तर सिंधी सेलूमध्ये लांब स्टेपलला 07 हजार 300 रुपये दर मिळाला.
तर कालचा बाजार भाव पाहिला असता सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपलला 7250 रुपये, एच 4 मध्यम स्टेपलला 7125 रुपये, तर मध्यम स्टेपलला हिंगणघाट बाजारात 7000 रुपये दर मिळाला. एकूणच मागील सात दिवसांचा बाजार भाव पाहिला असता बाजारात कोणत्याही प्रकारची वाढ नसल्याचा दिसून येत आहे. उलट 50 ते 100 रुपयांनी दर कमी होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : Wheat Market : गव्हाची एमएसपी किती? बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर