नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार येथे सीसीआयच्या प्रतिनिधींकडून शासकीय हमी भावानुसार कापूस खरेदीला (Cotton Market) प्रारंभ झाला आहे. यानंतर खासगी व्यापाऱ्यांनी सोमवारी कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर दिल्याने सीसीआयच्या खात्यात एक क्विंटलही कापूस जमा झाला नाही. मात्र दुसरीकडे पणन मंडळाच्या माहितीनुसार अपवाद वगळता कोणत्याच बाजार समितीत ७ हजार १०० रुपयांपेक्षा अधिक कापूस खरेदी होत नसल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाने यंदाच्या वर्षींचा हमीभाव (Cotton MSP) ठरवून दिला आहे. त्यानुसार मध्यम स्टेपल कापसाला ७१२१ रुपये, तर लॉन्ग स्टेपल कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभाव दिला आहे. मात्र बाजार समित्यांमध्ये मध्यम स्टेपल कापसाला एक दोन बाजार समित्या वगळता कोणत्याच बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत नाही. अशीच परिस्थिती लांब स्टेपल कापसाबाबत असल्याचे बाजार अहवालावरून दिसून येते.
दिवाळीपूर्वी नंदुरबार बाजार समितीच्या (Nandurbar Cotton Market) पळाशी येथील केंद्रात कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला होता. याठिकाणी प्रारंभीपासून कापसाचे दर हे प्रतिक्विंटल ६ हजार १०० ते ६ हजार ३०० पेक्षा अधिक नसल्याने शेतकऱ्यांनी माल आणणे बंद केले होते. दरम्यान सीसीआय केंद्र सुरू होऊन ७ हजार १२४ ते ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु गत महिनाभरापासून कापूस आवक वाढत नसल्याने नंदुरबार केंद्रात आवक कमी होती. आता सीसीआयचे केंद्र सुरु झाले असले तरीही बाजारभाव मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे.
आज काय भाव मिळाला?
आजच्या बाजार भाव अहवालानुसार मध्यम स्टेपल कापसाला हिंगणघाट बाजारात ०७ हजार १०० रुपये, वर्धा बाजारात ७१५० रुपये बार्शी टाकळी बाजारात ७ हजार ४२१ रुपये तर पुलगाव बाजारात ७ हजार १०० रुपये दर मिळाला आणि सिंधी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाला ०७ हजार २५० रुपये, तर पारशिवनी बाजारात एच ४ मध्यम स्टेपल कापसाला ०७ हजार ५० रुपये आणि लोकल कापसाला वरोरा शेगाव, काटोल बाजारात ७ हजार १०० रुपये, तर सर्वसाधारण कापसाला भद्रावती बाजारात ०७ हजार १३८ रुपये दर मिळाला.
वाचा आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/11/2024 | ||||||
सावनेर | --- | क्विंटल | 1100 | 7100 | 7125 | 7125 |
किनवट | --- | क्विंटल | 64 | 6800 | 7200 | 7000 |
भद्रावती | --- | क्विंटल | 243 | 7100 | 7175 | 7138 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 272 | 7000 | 7100 | 7050 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 500 | 6900 | 7140 | 7050 |
वरोरा-शेगाव | लोकल | क्विंटल | 188 | 7000 | 7275 | 7100 |
काटोल | लोकल | क्विंटल | 88 | 7000 | 7171 | 7100 |
कोर्पना | लोकल | क्विंटल | 5288 | 6800 | 7150 | 7000 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 317 | 7100 | 7295 | 7250 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 2000 | 6800 | 7370 | 7100 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 725 | 7025 | 7300 | 7150 |
बार्शी - टाकळी | मध्यम स्टेपल | क्विंटल | 900 | 7421 | 7421 | 7421 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1020 | 6800 | 7371 | 7100 |