Cotton Market : कापसाला समाधानकारक बाजारभाव (Cotton Market) मिळत असून ऑगस्ट महिन्यात किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा दर मिळत होता. त्यात आता भर पडली असून मागील आठवड्यात सरासरी 8142 रुपये प्रति क्विंटल रुपये दर मिळाला.
साधारण जून महिन्यात कापसाच्या (Weekly Cotton Market) किमती सात हजाराच्या घरात होत्या. जुलै नंतर यात वाढ ऑगस्ट महिन्यात 07 हजार 600 रुपयांपर्यंत दर मिळत गेला. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी हा दर 7 हजार 800 रुपयांपर्यंत गेला. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा दर 08 हजार 142 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला. दुसरीकडे 1 ऑगस्टपासून सुरु झालेल्या 2024-25 च्या हंगामात अमेरिकेत ब्राझील आणि तुर्कीसह पीक जास्त असेल या अपेक्षेने जागतिक कापूस दर कमी झाले आहेत.
किमान आधारभूत किंमतीत कापूस खरेदी करण्यासाठी सी. सी. आय. ही सरकारची नोडल एजन्सी आहे (MSP). जेव्हा किंमती एम. एस. पी. पातळीच्या खाली येतात तेव्हा ती खरेदी करते. कापसाचा हंगाम ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 पर्यंत चालतो. मागील आठवड्यातील बाजारभाव पाहिले असता अकोला बाजारात 7 हजार 858 रुपये प्रतिक्विंटल यवतमाळ बाजारात 7 हजार 780 रुपये प्रति क्विंटल, वर्धा बाजारात 7 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल, नागपूर बाजारात 07 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल, तर राजकोट बाजारात सर्वाधिक 8142 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर आज यावल बाजारात मध्यम स्टेपलच्या कापसाला क्विंटलमागे 6 हजार 640 रुपये दर मिळाला.
कापूस क्षेत्राला आधाराची गरज
दरम्यान वाढता खप आणि निर्यातीमध्ये विक्रमी कमी साठा असलेल्या भारताच्या कापूस क्षेत्राला गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. उत्पादन अंदाजांमधील विसंगती आधीच आव्हानात्मक आहे, जागतिक बाजारपेठेत पुरवठा स्थिरता आणि स्पर्धात्मकता सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता आहे. अनिश्चितता कायम राहिल्याने, जोखीम कमी करण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या बाजारपेठेच्या गतिशीलतेच्या पार्श्वभूमीवर उद्योगाची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय उपाय आवश्यक आहेत.