Lokmat Agro >बाजारहाट > Currant Production : राज्यातील बेदाणा उत्पादनात 50 हजार टनांची घट, दर काय मिळतोय? 

Currant Production : राज्यातील बेदाणा उत्पादनात 50 हजार टनांची घट, दर काय मिळतोय? 

Latest News Currant production in maharashtra state decreased by 50 thousand tons | Currant Production : राज्यातील बेदाणा उत्पादनात 50 हजार टनांची घट, दर काय मिळतोय? 

Currant Production : राज्यातील बेदाणा उत्पादनात 50 हजार टनांची घट, दर काय मिळतोय? 

यंदा बेदाणा उत्पादनात (Bedana) production) ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे.

यंदा बेदाणा उत्पादनात (Bedana) production) ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सांगली : राज्यात गतवर्षी दोन लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन (Bedana Production) झाले होते. यंदा त्यामध्ये ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे भाव प्रतिकिलो १३० ते २५० रुपयांपर्यंत आहेत.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) तीन ते चार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यातून दरवर्षी ३० लाख टनांपर्यंत उत्पादन होते. देशात द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. त्यातही नाशिक (Nashik) द्राक्ष उत्पादनात नंबर एक असून, त्यानंतर सांगली जिल्ह्याचा (sangali) नंबर लागतो. सोलापूर जिल्ह्यात ३.०९ टक्के व उस्मानाबाद जिल्ह्यात २.६९ टक्के  द्राक्ष उत्पादन होते. उरलेली ३.१५ टक्के उत्पादन अहमदनगर, पुणे, लातूर, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, बुलढाणा व जालना जिल्ह्यांत होत आहे.

बेदाण्याचे दरही पडले...!
२०२२-२३ च्या हंगामामध्ये महाराष्ट्रात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे दर कमी होते. त्यामुळे शेतकरी बेदाण्याकडे वळला होता. यामुळे बेदाण्याचे विक्रमी दोन लाख ७० हजार टनांपर्यंत उत्पादन झाले होते. शीतगृहे बेदाण्याने फुल्ल झाली होती. परिणामी बेदाण्याचे दरही पडले.

सांगलीत बेदाण्याचे दर (प्रतिकिलो)

सांगली बाजारात हिरवा बेदाणा १५० ते २५० किलो, पिवळा बेदाणा १२० ते १७० किलो, काळा बेदाणा ४० ते ७० किलो असे दर आहेत. तर पणन मंडळाच्या अधिकृतर माहितीनुसार 30 मे रोजीच्या बाजार अहवालानुसार तासगाव बाजार समितीत हिरवा बेदाणा क्विंटलमागे 14 हजार 200 रुपये, काळ्या बेदाण्यास 5600 रुपये तर सर्वाधिक 14 हजार 600 रुपयांचा दर हा पिवळ्या बेदाण्यास मिळतो आहे. 

Web Title: Latest News Currant production in maharashtra state decreased by 50 thousand tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.