Dalimb Bajarbhav : आजच्या ७ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मोशी बाजार समितीत डाळींबाची ९ क्विंटलची आवक झाली. तर मालाला सरासरी १० हजार रुपयांचा दर मिळाला. तर कालच्या ६ सप्टेंबर रोजीच्या बाजार अहवालानुसार मुंबई फ्रुट मार्केटमध्ये १२३९ क्विंटलची आवक होऊन सरासरी १२ हजार रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारात क्विंटलला ११ हजार रुपये दर मिळाला.
तसेच सोलापूर बाजारात लोकल डाळींबाला ८ हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये ९ हजार ५०० रुपये, पुणे-,मोशी बाजारात ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर नाशिकमार्केट यार्डमध्ये मृदुला डाळींबाला ११ हजार रुपये दर मिळाला. तर आटपाडी बाजारात भगवा डाळींबाला क्विंटलमागे १३ हजार रुपये दर मिळाला.
नाशिक कृषी उत्पन्न फळ बाजार समितीत (Nashik Market Yard) गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाच्या केवळ १५ ते २० वाहने माल येत असल्याने डाळिंबाचे दर तीनशे रुपये किलोवर पोहोचले आहे. काही वर्षांपासून डाळिंब फळ उत्पादन अनेक कारणाने घटले असले तरी दुसरीकडे मात्र बाजारभावाची गोडी यंदा कायम असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी अत्यल्प समाधानी आहेत.
नाशिकमध्ये आवक घसरली
यावर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभीपासूनच डाळिंबाचे दर तेजीत असल्याने डाळिंब उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून डाळिंब फळाची आवक कमी झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर, नगर, संगमनेर नाशिक जिल्ह्यातील सटाणा भागातून कृउबा, नाशिक बाजार समितीत दैनंदिन १५ ते २० वाहने डाळिंब विक्रीसाठी येत आहेत. नाशिक बाजार समितीच्या फळ बाजारातून दैनंदिन संपूर्ण भारतभर बंगळुरू, नेपाळ, बांगलादेशमध्ये डाळिंब माल रवाना केला जातो.