Join us

Dalimb Niryat : अहिल्यानगरहुन 14 टन डाळींब समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचली, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 20:44 IST

Dalimb Niryat : चवीला उत्कृष्ट असलेल्या या भगवा जातीच्या भारतीय डाळिंबाच्या (Dalimb Niryat) फळामुळे अमेरिकेतला ग्राहकवर्गही प्रचंड प्रभावित झाला.

Dalimb Niryat :  भारतीय डाळिंबांची 4,620 खोक्यांची आणि अंदाजे 14 टन वजनाची पहिली सागरी खेप, आपल्या प्रस्थानानंतर पाच आठवड्यांच्या आत, म्हणजेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचली. चवीला उत्कृष्ट असलेल्या या भगवा जातीच्या भारतीय डाळिंबाच्या (Dalimb Niryat) फळामुळे अमेरिकेतला ग्राहकवर्गही प्रचंड प्रभावित झाला.

अपेडाने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या सहकार्याने डाळिंबांच्या (Pomegranate Export) टिकावूपणासंबंधी आणखी एक यशस्वी चाचणी केली. यामुळे डाळिंबांचे आयुष्य अर्थात त्यांच्या आहे त्या स्थितीत टिकून राहण्याची क्षमता 60 दिवसांपर्यंत वाढवण्यातही यश मिळाले. याचमुळे भारताने फेब्रुवारी 2024 मध्ये तब्बल 4200 खोके म्हणजेच 12.6 टन डाळिंबांच्या निर्यातीची पहिली व्यावसायिक सागरी चाचणी खेप अमेरिकेला  यशस्वीरित्या रवाना केली होती. 

ही सागरी चाचणी खेप नवी मुंबईतील वाशी इथल्या इरेडिएशन फॅसिलिटी सेंटरमधील इनी फार्म्स आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या (Maharashtra State Agricultural Marketing Board - MSAMB) सहकार्याने पूर्ण केली गेली होती. डाळिंबांच्या अमेरिकेतील निर्यातीसाठी, अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) प्रत्यक्ष निर्यापूर्व प्रक्रिया म्हणून आखून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यासंबंधीचा मार्गदर्शनपर उपक्रम अपेडाने डिसेंबर 2024 मध्ये सुरु केला होता. अपेडाने प्रत्यक्ष निर्यातीच्या तीन महिने अगोदर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या निरीक्षकांना निर्यातपूर्व तपासणीसाठी आमंत्रित करण्याचे धोरण अवलंबले, यामुळे ही व्यावयायिक खेप अमेरिकेत वेळेवर आणि सुरळीतपणे पोहोचण्यात मोठी मदत झाली.

हवाई मार्गाचीही चाचणी यशस्वी अमेरिकेने 2023 च्या हंगामात आपली बाजापेठ भारतीय डाळिंबांसाठी खुली केली होती. त्यानंतर अपेडाने अमेरिकेच्या कृषी विभागाअंतर्गत प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा विभाग, राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था आणि सोलापूर इथले राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (National Research Centre for Pomegranate, Solapur - NRCP) यांच्या सहकार्याने अमेरिकेत हवाई मार्गाने डाळिंबांची निर्यात करण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती.

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती